चटपटीत गरमागरम थंडी स्पेशल ज्वारीचा हुरडा

by Vaishali Chaudhari
124 views

चटपटीत गरमागरम थंडी स्पेशल ज्वारीचा हुरडा


प्रस्तावना::

ज्वारीचा हुरडा हा थंडीच्या दिवसांमध्येच येतो. ज्वारी अर्धवट कच्ची असताना त्याचे दाणे काढून त्याची रेसिपी बनवली जाते. शेता मध्ये मोठ्या मोठ्या हुरडा पार्टी केल्या जातात. हुरडा हा अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे.

साहित्य::

  • 100 ग्राम हुरडा
  • एक चमचा तीळ
  • चवीप्रमाणे मीठ
  • तेल
  • चुटकीभर तिखट
  • साखर


कृती::


थंडीच्या दिवसांवर बाजारातन हुरडा आला की तू नक्की आणावा. ज्वारी ही शरीराला अत्यंत पौष्टिक असते.


प्रकार नंबर १:


आणल्यानंतर तो साफ करून घ्यावा. त्यानंतर कढईमध्ये किंवा तव्यावर तेल घाला. तेल थोडे तापले की त्यामध्ये ज्वारीचा हुरडा घाला.

घोडा घातल्यानंतर त्यावर साधारण दोन मिनिटे झाकण ठेवा. झाकण ठेवल्यानंतर हुरडा व्यवस्थित परतून घ्या.

हुरडा परतल्यानंतर त्यामध्ये चुटकीभर तिखट घाला. तिखट इथे ऑप्शनल आहे तिखट तुम्ही नाही घातले तरी चालेल.

यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे मीठ घाला. आणि एक चमचा तीळ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. हा उघडा चांगला भाजला गेला की गॅस बंद करा.

आणि आपली. हुरडा रेसिपी तयार झालेली आहे…..यावर तुम्ही साखर घेऊन सुद्धा खाऊ शकतात………


प्रकार नंबर २::


साहित्य::

  • 100 ग्राम हुरडा
  • एक टोमॅटो
  • एक कांदा
  • कोथिंबीर
  • तेल
  • मीठ
  • चिटकीभर तिखट
  • बारीक शेव
  • आणि चाट मसाला


कृती::
तव्यावर किंवा कढईमध्ये एक ते एक चमचा तेल घाला. त्यामध्ये हुरडा घाला. आणि हुरडा चांगले दोन मिनिटे झाकण ठेवून परतवून घ्या.

अधून मधून तो खालचा वर करा. त्यानंतर चुटकीभर तिखट चवीप्रमाणे मीठ घाला आणि तीळ घाला. आणि एक ते दोन मिनिट पुन्हा परतवून घ्या.

आता हा हुरडा डिश मध्ये काढून घ्या त्यावर तुम्ही चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो चिरलेली कोथिंबीर आणि वरून चाट मसाला घाला .आणि बारीक शेव घाला .आपला हुरडा चाट तयार झालेला आहे….

टिप्स::


हुरडा करताना जास्त भाजू नका त्यामुळे तो कडक होतो हुरडा हा नरमच चवीला छान लागतो.


वेळ व परिमाण::
एकूण वेळ: १० मिनिटे
परिमाण: १ व्यक्तीसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

15301

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.