चॉकलेट श्रीखंड- Chokelt Shrikhand

by Vaishali Chaudhari
19 views

चॉकलेट श्रीखंड

प्रस्तावना:::

चॉकलेट म्हटले म्हणजे मुलांच्या तोंडाला तर पाणी सुटेलच… आणि त्यातल्या त्यात श्रीखंड म्हटले तर मुलांना खूपच आवडते… त्यामुळे चॉकलेटची श्रीखंड म्हटले तर किती मज्जा येईल… लहानापासून मोठ्यापर्यंत हे श्रीखंड सर्वांना आवडते…


साहित्य:::

  • सहाशे ग्रॅम चक्का
  • दीड वाटी पिठी साखर
  • तीन वेलची
  • चार ते पाच काजू
  • दोन ते तीन बदाम
  • एक ते दीड चमचा कोको पावडर
  • 15 ते 20 चोको चिप्स

कृती:::

सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये चक्का घ्या… त्यामध्ये दीड वाटी पिठीसाखर घाला… आता हे विस्कर साह्याने चांगले फेटून घ्या…

विस्करच्या साह्याने फेटा… साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घाला… त्यानंतर विस्कर पुन्हा फेटून घ्या…

त्यामध्ये कोको पावडर घाला आणि व्यवस्थित फेटून घ्या…त्यामध्ये काजू बदाम चे तुकडे घाला .. आता यामध्ये चोको चिप्स घाला…..

आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या…आता आपले चॉकलेट श्रीखंड तयार झालेले आहे… एन्जॉय करूया श्रीखंड…

टिप्स:::

श्रीखंड तयार करताना विस्करच्या साह्याने चांगले फेटा… इथे आपण पूर्वी तयार केलेला ड्रायफ्रूट्स श्रीखंडाचा बेस वापरू शकतो
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.