व्हेज हक्क नूडल्स
प्रस्तावना:::

चायनीज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते… त्यातल्या त्यात लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही नूडल्स चे प्रकार आवडतात… आज आपण पार्टीसाठी कॉन्टिटी मध्ये हक्का नूडल्स बनवणार आहे…
साहित्य:::

- हक्का नूडल्स ची तीन पॅकेट
- अर्धा किलो पत्ताकोबी
- पाव किलो सिमला मिरची
- पाच ते सहा कांदे
- कोथिंबीर
- अर्धावाटी लसूण पाकळ्या
- एक इंच अद्रकाचा तुकडा
- अर्धा चमचा मिरे पूड
- दोन चमचे सोया सॉस
- दोन चमचे रेड चिली सॉस ‘
- दोन चमचे ग्रीन चिली सॉस
- दोन चमचे शेजवान सॉस
- एक पॅकेट हक्क नूडल्स मसाला
- एक चमचा तिखट
- मीठ चवीप्रमाणे
- परतायसाठी तेल’
- पाणी
कृती::
नूडल्स पॅकेट फोडून त्याचे थोडे तुकडे करून घ्या… एका पातेल्यामध्ये गरम पाणी करा त्यामध्ये थोडे मीठ घाला…
आणि पाच ते सहा मिनिटे नूडल्स उकळवून घ्या.. नूडल्स व्यवस्थित उकडल्यानंतर चाळणीमध्ये गाळून घ्या…
त्यानंतर त्यावर थंड पाणी घाला.. थंड पाणी घातल्यामुळे नूडल्स मोकळ्या होतील… त्या चिकट होणार नाहीत….

आता पत्ताकोबी आपल्याला लांब चिरून घ्यायची आहे तसेच कांदा सुद्धा लांब चिरून घ्यायचा आहे सिमला मिरची लांब चिरून घ्यायची आहे….
लसणाचे काप करून घ्यायचे आहे… अद्रक किसून घ्या… कढईमध्ये तेल गरम करा… कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसणाचे काप आणि अद्रकाची किस घालून परतवून घ्या….
त्यानंतर त्यामध्ये सिमला मिरची घाला…. चिरलेला कांदा चिरलेली पत्ताकोबी घाला…. आणि मिश्रण चांगले परतवून घ्या…

आपल्याला हे मिश्रण शिजू द्यायचे नाही… त्यावर लगेचच दोन चमचे सोया सॉस दोन चमचे चिली सॉस दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे शेजवान सॉस आणि हक्का नूडल्स मसाला घाला….

त्यामध्ये तिखट घाला…. त्यानंतर अर्धा चमचा मिरे पूड घाला…आता यामध्ये नूडल्स घाला… आणि नूडल्स व्यवस्थित परतून घ्या. त्यावर चवीप्रमाणे मीठ घाला….

नूडल्स आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्या….. सर्वात शेवटी त्यामध्ये वर चिरलेली कोथिंबीर घाला…. आपले हक्का नूडल्स आता तयार झालेले आहे….
चला तर मग एन्जॉय करूया व्हेज हक्का नूडल्स … यामध्ये सुद्धा मी अजून अजिनोमोटो चा वापर केलेला नाही….
जरी आपण यामध्ये वापर केलेला नसला तरी आपण जो वेज हक्का नूडल्स चा मसाला वापरलेला आहे… त्यामध्ये थोडेफार अजिनोमोटो चे प्रमाण असते… त्यामुळे सेपरेट घालायची गरज नाही….
चला तर मग एन्जॉय करूया गरमागरम व्हेज हाका नूडल्स…..

टिप्स:::
ज्यावेळेस आपण नूडल्स उकळतो त्यावेळेस पाण्यामध्ये एक चमचा तुम्ही तेल घालू शकतात… त्यामुळे नूडल्स आहेत… नूडल्स सेपरेट सेपरेट होतील….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ ::६०मिनिटे
परिमाण:१५ व्यक्तीसाठी
