कारल्याची भाजी

by Vaishali Chaudhari
12 views

कारल्याची भाजी पण कडसाळपणा कमी असणारी

प्रस्तावना::

कारल्याची भाजी म्हटलं की सर्वांना नको असते…. पण तीच जर भाजी मधील कडवटपणा जर कमी लागला तर भाजी कोणीही खाईल अशी….

कारल्याची भाजी


साहित्य::

कारल्याची भाजी – फोटो 2
  • पाव किलो कारले
  • चार मिरच्या
  • कोथिंबीर
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • पाव चमचा हळद
  • एक चमचा तिखट
  • दोन ते तीन चिंचेचे बटुक
  • चार ते पाच लहानगुळाचे खडे
  • मीठ
  • फोडणीसाठी तेल

कृती:::

कारले स्वच्छ धुऊन गोल चकत्या कापून घ्या… चिरलेल्या कारल्यांना मीठ लावून घ्या…

आणि अर्धा तास तसेच ठेवून द्या… आता कांदा बारीक चिरून घ्या अद्रक लसणाची पेस्ट करून घ्या… मिरचीचे काप करून घ्या…

कढईमध्ये तेल गरम करून घ्या… त्यामध्ये जिरे मोहरी घाला.. मिरचीचे काप घाला परतवून घ्या…. त्यानंतर त्यामध्ये कांदा परतून घ्या…

कारल्याची भाजी – फोटो 3

अद्रक लसणाची पेस्ट घालून परतून घ्या… पाव चमचा हळद एक चमचा तिखट घालून परतून घ्या…. आता या मिश्रणामध्ये चिरलेले कारले घाला…

कारल्याची भाजी – फोटो 4

आणि दहा मिनिटे वाफवून घ्या… त्यामध्ये चिंच आणि गूळ घाला…. अधून मधून मिक्स करून म्हणजेच ढवळून घेत जा…

म्हणजे भाजी लागणार नाही…. आता आपले चवीप्रमाणे मीठ घाला…. कोथिंबीर घाला….. पुन्हा पाच मिनिटे भाजी वाफवून घ्या…

कारल्याची भाजी – फोटो 5

आपली कारल्याची आंबट गोड चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे…. तुम्ही पोळी सोबत चपाती सोबत फुलक्या सोबत खाऊ शकता…

गरमागरम कारल्याची भाजी….

टिप्स:::

चिंच आणि गूळ करण्याच्या भाजीमध्ये आवश्य घालावे त्यामुळे कडवटपणा कमी होतो… तसेच कारल्यांना मीठ लावून ठेवावे मी त्यामध्ये मुरले की त्यामधील कडवटपणा कमी होण्यास मदत होते….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण:दोन व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.