साबुदाणा आणि कच्ची केळीचे पळीपापड

by Vaishali Chaudhari
0 views

साबुदाणा आणि कच्ची केळीचे पळीपापड


प्रस्तावना::

आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड नेहमीच करत असतो… पण काहीतरी वेगळं करायचं म्हणजे आपण आता यामध्ये कच्च्या केळीचा वापर करणार आहे…. एक वेगळी चव पापडाला येते… आणि हे पापड तळून किंवा भाजी नाही तुम्ही खाऊ शकता….

साहित्य::

दोन मोठी वाटी साबुदाणा 24 कच्ची केळी पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन चमचे जिरे दोन चमचे मीठ एक चमचा वाळलेल्या मिरच्यांचे तिखट तेलआणि पाणी


कृती::

कच्ची केळी सर्व धुवून घ्या.. कच्ची केळी धुवून सोलून घ्या.. कच्ची केळीचे काम करून घ्या.. दोन वाटी साबुदाणा रात्री पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी आपल्याला हे पापड करायचे आहे… कच्ची केळी सोडल्यानंतर काम केल्यानंतर मिक्सरमधून बारीक फिरून घ्या… कच्चा केळ्याची पेस्ट करून घ्या.. या पद्धतीने सर्व केळ्यांची पेस्ट करून घ्या… सर्व खेळांचे प्रेस केल्यानंतर पाच ते सहा मिरच्या ची सुद्धा पाणी घालून पेस्ट करून घ्या… आता एका पितळी पातेल्यामध्ये थोडे तेल लावा… तेल आपल्याला यासाठी लावायचे आहे जे आपण मिश्रण शिजवणार आहे ते तळाशी चिकटणार नाही.. त्यासाठी आपल्याला तेल लावायचे आहे… त्यानंतर त्यामध्ये साधारण सहा ग्लास इतके पाणी घाला… पाणी चांगले खळखळून उकळून घ्या… पाणी खळखळून उकडून झाल्यानंतर त्यामध्ये मिरचीची पेस्ट घाला आणि एक चमचा तिखट घाला… त्यामध्ये दोन चमचे मीठ घाला…. त्यानंतर त्यामध्ये जिरे घाला… सर्व मिश्रण व्यवस्थित उकळून घ्या. सर्व मिश्रण उकडल्यानंतर त्यामध्ये केळ्याची बारीक केलेली पेस्ट घाला… त्यामध्ये दोन वाट्या भिजलेल्या साबुदाणा घाला…. हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे.. हे मिश्रण साधारण पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे… हे मिश्रण अगदी काचेसारखे दिसायला हवे… मिश्रण खाली लागणार नाही त्यासाठी आपण तेल लावलेलेच आहे परंतु मिश्रण तरीही सतत ढवळत राहायचे आहे… पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर काचे सारखी दिसायला लागले की मग गॅस बंद करायचा… नाहीतर पुन्हा पाच मिनिटे शिजू द्यायचे… आता मिश्रण दहा मिनिटे थंड होऊ द्यायचं… हे मिश्रण थंड झाल्यानंतर मग आपल्याला जाड पेपरवर पोळीच्या साह्याने आपल्याला पापड घालायचं आहे…. हे पापड उन्हामध्ये घालायचे आहे… पापड सर्व पळीच्या साह्याने घालायचे आहे… या पापडाचे आकार छोटे किंवा मोठे असू द्या… तुम्ही छोटे पापड घातले तर हे तळण्या सोपे जातात… आणि मोठ्या आकाराचे घातल्यास ते भाजण्यासाठी उपयोगी येतात… या पद्धतीने सर्व पापड आपल्याला वाळत घालायचे आहे… त्यानंतर पापड घातल्यानंतर दोन दिवस आपल्याला पापड वाळण्यासाठी लागणार आहे… हे पापड एकदम उन्हामध्ये कोरडे करायचे आहे… कोरडे कट झाल्यानंतर एका तिच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे…. नंतर तुम्ही ते तळू शकतात किंवा भाजू शकतात…. हे पापड उपवासाला ही खाल्ले जातात.. तसेच लहान मुलांना केळ्यामधून जास्त प्रोटीन मिळते त्यामुळे हे फायदेशीर असते….. आपले उन्हाळी वाळवण्याचे केळीचे पळी पापड तयार झालेले आहेत…

टिप्स::

मिश्रण घट्ट वाटत असल्यास तुम्ही थोडे त्यामध्ये गरम पाणी घालून पुन्हा पाच मिनिटे शिजवून घेऊ शकतात… कारण परी पापड घालताना मिश्रण एकदम घट्ट झाले तर पोळी पापड लवकर वाळत नाही….

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7977

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.