साबुदाणा आणि कच्ची केळीचे पळीपापड
प्रस्तावना::
आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड नेहमीच करत असतो… पण काहीतरी वेगळं करायचं म्हणजे आपण आता यामध्ये कच्च्या केळीचा वापर करणार आहे…. एक वेगळी चव पापडाला येते… आणि हे पापड तळून किंवा भाजी नाही तुम्ही खाऊ शकता….
साहित्य::

- दोन मोठी वाटी साबुदाणा
- 24 कच्ची केळी
- पाच ते सहा हिरव्या मिरच्या
- दोन चमचे जिरे
- दोन चमचे मीठ
- एक चमचा वाळलेल्या मिरच्यांचे तिखट
- तेलआणि
- पाणी
कृती::
कच्ची केळी सर्व धुवून घ्या.. कच्ची केळी धुवून सोलून घ्या.. कच्ची केळीचे काम करून घ्या.. दोन वाटी साबुदाणा रात्री पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी आपल्याला हे पापड करायचे आहे…
कच्ची केळी सोडल्यानंतर काम केल्यानंतर मिक्सरमधून बारीक फिरून घ्या… कच्चा केळ्याची पेस्ट करून घ्या.. या पद्धतीने सर्व केळ्यांची पेस्ट करून घ्या…
सर्व खेळांचे प्रेस केल्यानंतर पाच ते सहा मिरच्या ची सुद्धा पाणी घालून पेस्ट करून घ्या… आता एका पितळी पातेल्यामध्ये थोडे तेल लावा…
तेल आपल्याला यासाठी लावायचे आहे जे आपण मिश्रण शिजवणार आहे ते तळाशी चिकटणार नाही.. त्यासाठी आपल्याला तेल लावायचे आहे…
त्यानंतर त्यामध्ये साधारण सहा ग्लास इतके पाणी घाला… पाणी चांगले खळखळून उकळून घ्या… पाणी खळखळून उकडून झाल्यानंतर त्यामध्ये मिरचीची पेस्ट घाला आणि एक चमचा तिखट घाला…
त्यामध्ये दोन चमचे मीठ घाला…. त्यानंतर त्यामध्ये जिरे घाला… सर्व मिश्रण व्यवस्थित उकळून घ्या. सर्व मिश्रण उकडल्यानंतर त्यामध्ये केळ्याची बारीक केलेली पेस्ट घाला…

त्यामध्ये दोन वाट्या भिजलेल्या साबुदाणा घाला…. हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे.. हे मिश्रण साधारण पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे…

हे मिश्रण अगदी काचेसारखे दिसायला हवे… मिश्रण खाली लागणार नाही त्यासाठी आपण तेल लावलेलेच आहे परंतु मिश्रण तरीही सतत ढवळत राहायचे आहे…
पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर काचे सारखी दिसायला लागले की मग गॅस बंद करायचा… नाहीतर पुन्हा पाच मिनिटे शिजू द्यायचे…
आता मिश्रण दहा मिनिटे थंड होऊ द्यायचं… हे मिश्रण थंड झाल्यानंतर मग आपल्याला जाड पेपरवर पळीच्या साह्याने आपल्याला पापड घालायचं आहे….

हे पापड उन्हामध्ये घालायचे आहे… पापड सर्व पळीच्या साह्याने घालायचे आहे… या पापडाचे आकार छोटे किंवा मोठे असू द्या…

तुम्ही छोटे पापड घातले तर हे तळण्या सोपे जातात… आणि मोठ्या आकाराचे घातल्यास ते भाजण्यासाठी उपयोगी येतात…
या पद्धतीने सर्व पापड आपल्याला वाळत घालायचे आहे… त्यानंतर पापड घातल्यानंतर दोन दिवस आपल्याला पापड वाळण्यासाठी लागणार आहे…
हे पापड एकदम उन्हामध्ये कोरडे करायचे आहे… कोरडे कट झाल्यानंतर एका तिच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे….

नंतर तुम्ही ते तळू शकतात किंवा भाजू शकतात…. हे पापड उपवासाला ही खाल्ले जातात.. त

सेच लहान मुलांना केळ्यामधून जास्त प्रोटीन मिळते त्यामुळे हे फायदेशीर असते….. आपले उन्हाळी वाळवण्याचे केळीचे पळी पापड तयार झालेले आहेत…
टिप्स::
मिश्रण घट्ट वाटत असल्यास तुम्ही थोडे त्यामध्ये गरम पाणी घालून पुन्हा पाच मिनिटे शिजवून घेऊ शकतात… कारण परी पापड घालताना मिश्रण एकदम घट्ट झाले तर पोळी पापड लवकर वाळत नाही….
