जास्त शिजलेल्या पांढऱ्या छोल्यांपासून तयार केलेले पुरण

by Vaishali Chaudhari
0 views

जास्त शिजलेल्या पांढऱ्या छोल्यांपासून तयार केलेले पुरण


प्रस्तावना:::

आज मला मसाले छोले करायचे होते पण छोले शिजवताना माझ्याने त्याच्या जास्त शिट्ट्या होऊन गेल्या होत्या… एकदम जास्त गचका होऊन गेला..


साहित्य:::

  • एक डबाभर छोले अगदी गजगत शिजलेले
  • पाऊण डबा किसलेला गूळ
  • चार वेलची जायफळ


कृती:::

छोले जास्त शिजलेले असल्यामुळे सहजच ते एकदम बारीक होतील… छोले मिक्सर मधून फिरवून त्यात अगदी थोडे पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्या..

म्हणजे पुरण पुन्हा पुरण यंत्रातून पडण्याची गरज पडणार नाही… सर्व छोले मिक्सर मधून फिरवून घ्या….

एकदम बारीक छोले झाल्यानंतर एका कढई मध्ये एक चमचा पाणी घाला.. त्यानंतर त्यामध्ये छोल्यांचे बारीक मिश्रण घाला…

त्यामध्ये पाऊण डबा गुळ घाला.. आणि हे मिश्रण सतत ढवळत रहा… पुरण खाली तळाशी लागू देऊ नका…

आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि कढईचे सुटेपर्यंत पुरण शिजवत रहा.. गॅसची आच मंद राहू द्या.. इथे मी इंडक्शन वर पुरण शिजवलेले आहे….

पुरण शिजले की नाही हे कसं समजायचं त्याला एक घट्टसरपणा येतो म्हणजेच गोळा तयार होतो.. तसेच आजूबाजूने कोरडेपणा येतो त्यामुळे पुरण झाले असे समजते….

पुरण आपण आधीच मिक्सरमधून फिरवले आहे त्यामुळे आपल्याला पुरणयंत्रातून काढण्याची गरज नाही…

पुरण शिजत आले की वेलची सोलून घ्या आणि खलबत्त्यामध्ये वेलची आणि थोडी जायफळ बारीक अशी कुटून घ्या ही वेलची पूड पूरणामध्ये घाला…

आणि पुरण व्यवस्थित एकत्र करून घ्या… आता आपले पुरण पूर्णपणे शिकलेले आहे… गॅस बंद करा आणि पुरण थोडे थंड होऊ द्या ..

आपले पुराण तयार झालेले आहे.. याच्या पोळ्या तयार होण्यास तयार झालेले आहेत.. साधारण एका डब्याच्या मिश्रणाच्या पाच पुरणपोळ्या होतील…

एखाद्या बिघडलेल्या वस्तू पासून एखादी चवदार खाद्यपदार्थ तयार झाल तर किती छान!!!!


आज आपल्या जास्त शिजलेल्या छोल्यांपासून गोड्याचा पदार्थ तयार झाला!!! ते म्हणजे सर्वांची आवडती पुरणपोळी!!!!

अशा नवीन नवीन टीप साठी आम्हाला नक्की फॉलो करा… म्हणजे तुम्हाला वेस्ट पासून बेस्ट ऑप्शन असेल……


टिप्स:::

हे छोले जास्त शिजले असले तर त्यापासून गोड पदार्थ.. तसेच चटक-मटक पदार्थ कसा तयार होईल हे पाहता येईल… यापासून तुम्ही कटलेट सुद्धा तयार करू शकता…..


वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण ५पोळ्या

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8435

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.