कच्च्या टोमॅटोची हिरवी रस्सा भाजी

by Vaishali Chaudhari
9 views

कच्च्या टोमॅटोची हिरवी रस्सा भाजी


प्रस्तावना::

खानदेश स्पेशल भागातील ही हिरवी रस्सा भाजी अत्यंत चवदार लागते…. कारण यामध्ये टोमॅटोची चव तसेच तुरीच्या डाळीची चव घालून केलेली झणझणीत अशी आणि सोबत कांदा आणि नवीन लोणचे गरमागरम ज्वारीची भाकरी!!!


साहित्य::

  • दोन कच्चे टोमॅटो
  • अर्धी वाटी तुरीची डाळ
  • आठ हिरव्या मिरच्या
  • आठ लसूण पाकळ्या
  • अगदी छोटा अद्रकाचा तुकडा
  • कोथिंबीर
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • लसणाची काप
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा धनापुर
  • पाव चमचा गरम मसाला
  • चवीप्रमाणे मीठ पाणी


कृती:::

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या त्यांना चिरून घ्या… त्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ धुऊन घ्या ……

आणि आणि कुकरमध्ये तुरीची डाळ आणि टोमॅटो एकत्र शिजवण्यास ठेवा साधारण कुकरच्या तीन शिट्या होऊ द्या…

म्हणजे डाळही मऊ शिजेल आणि टोमॅटो ही मऊ शिजतील…. त्यानंतर तवा गरम करून घ्या त्यावर हिरव्या मिरच्या अगदी खरपूस भाजून घ्या.. त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्या..

शेंगदाण्याची साल काढून घ्या… त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या शेंगदाणे आठ लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा थोडी कोथिंबीर घालून पाणी घालून बारीक अशी चटणी वाटून घ्या…

चटणीची पेस्ट एकदम आपल्याला बारीक करायची आहे… आता एका कढईमध्ये तेल गरम करा.. त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घाला त्यामध्येच लसणाचे काप घाला…

लसणाच्या कापला अगदीच ब्राऊन रंग येऊ द्या… त्यानंतर त्यामध्ये चटणी घाला…. या चटणीला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचे आहे…

त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धनापुर आणि पाव चमचा गरम मसाला घाला… चटणीच्या आजूबाजूला तेल सुटते….

साधारण पाच मिनिटे तरी चटणी पचवण्यासाठी आपल्याला लागतात…. त्यानंतर आपल्याला टोमॅटो आणि तुरीच्या डाळीचे मिश्रण त्यामध्ये घालायचे आहे आणि साधारण पाच ते दहा मिनिटे आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे…

त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे…. त्यावर अर्धवट असे झाकण ठेवा… भाजीला उकड्या आल्यानंतर भाजीचा गॅस बंद करा..

त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर वरून घाला… आपले कच्च्या टोमॅटोची हिरवी रस्सा भाजी तयार आहे… यामध्ये तिखट आणि आंबट चव असल्यामुळे भाजीची चव अत्यंत उत्कृष्ट लागते….

ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत तसेच चपात्या सोबत खाऊ शकतात….


टिप्स :::

ज्यांना आंबट भाजी आवडत नाही… त्यांच्यासाठी हीच टिप्स दिलेली आहे… ज्यावेळेस आपण कच्चे टोमॅटो कापतो त्यावेळेस मधला गर काढून घ्या आणि पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घ्या त्यामुळे भाजीमध्ये थोडाही आंबटपणा राहणार नाही….


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ १०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10252

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.