अळूच्या पानांच्या कुरकुरीत झणझणीत अशा वड्या

by Vaishali Chaudhari
0 views

अळूच्या पानांच्या कुरकुरीत झणझणीत अशा वड्या


प्रस्तावना::

वड्या म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते… त्यातल्या त्यात अळूच्या वड्या खमंग वा किती छान!!!! त्यात गरमागरम मिळाल्या म्हणजे एकदमच मस्त!!! अळूला पोथीचे पान असे सुद्धा म्हटले जाते पोथीच्या पानाच्या वड्या!!!! पोथीचे पान हा गावाकडील शब्द आहे!!!! शिवाय बाहेर पाऊस पडत असला आणि गरमागरम जर वड्या समोर आल्या तर किती छान आणि त्या खमंग आणि कुरकुरीत!!!


साहित्य:::

  • दहा अळूची पाने
  • एक मोठी वाटी बेसन
  • अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  • पंधरा ते वीस लसूण पाकळ्या
  • आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा धनापूर
  • कोथिंबीर
  • एक चमचा खसखस
  • चवीप्रमाणे मीठ
  • आणि तळण्यासाठी तेल


कृती:::

अळूचे पान स्वच्छ धुऊन घ्या… त्यानंतर अळूच्या पानांच्या ज्या मोठ्या मोठ्या शिऱ्या आहेत त्या सुरीच्या साह्याने काढून घ्या…

कारण अळूची पाने कधी कधी घसा धरतात म्हणजेच घशामध्ये खवखव करतात त्यामुळे या शिरा काढून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा पाणी धुऊन कोरडी करून घ्यायची….

त्यानंतर अद्रक लसूण मिरची याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या… आता एका पातेल्यामध्ये बेसन तांदळाचे पीठ घाला त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घाला …..

पाव चमचा हळद पाव चमचा धनापूर त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घाला आता थोडे थोडे पाणी घालून याचे बेटर तयार करून घ्या यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला….

ह्या वड्या मध्ये थोड्या चांगले मीठ म्हणजेच योग्य प्रमाणात मीठ असले पाहिजेत म्हणजे वड्या अगदी रुचकर लागतील….

त्यानंतर हे मिश्रण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्टसर राहू द्यावे एकदम पातळ करू नये जेणेकरून ते पानाला आपण लावू शकू इतपत ते घट्ट हवे….

त्यानंतर अळूच्या पाने घ्या त्याला हे बेसनचे मिश्रण लावा नंतर एक पान ज्यावर आपण भाजी कापतो त्यावर ठेवा …….

त्यानंतर बेसनाचे मिश्रण त्याला लावा त्यानंतर त्यावर दुसरे पान ठेवा पुन्हा त्याला बेसनाचे मिश्रण लावा असे करून तिसरे चौथी पाचवी पण लावून घ्या …….

त्यानंतर दोघे बाजू पानांच्या दुमडून घ्या आणि त्याचा रोल करून घ्या आणि त्यावर थोडी खसखस लावा… आता तो रोल एका चाळणीला तेल लावून घ्या आणि त्यावर ठेवा…

त्यानंतर याच प्रमाणे आपल्याला अजून एक पान ठेवून त्यावर बेसनाचे मिश्रण लावून दुसरे तिसरे चौथे आणि पाचवी असे पान ठेवून त्याचा रोल करून घ्यायचा आहे……

अशी दोन किंवा तीन रोल आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि ते चाळणी मध्ये ठेवायचे आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करा पाणी साधारण पातेल्यामध्ये निम्मे हवे …….

आणि त्याला उघड्या फुटल्यानंतर आपण ज्या चाळणीमध्ये रोल ठेवलेले आहे ती चाळणी पातेल्यावर ठेवा आणि साधारण 15 मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे……

त्यावर झाकण ठेवायचे आहे आणि पंधरा मिनिटे मध्यम आचेवर आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करा…

आणि झाकण काढून रोल थंड होऊ द्या… रोल थंड झाल्यानंतर त्याचे गोल असे काप करून घ्या आणि आता ही जी गोल रोल कापलेले आहेत …….

ते तुम्ही कडकडीत तेलामध्ये खमंग होईपर्यंत आणि तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या… आपले हे अळूचे वड्या छान अशा खमंग होतील…

आणि कुरकुरीत होतील कारण यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे वड्या अगदी खमंग राहतील आणि कुरकुरीत होतील…

तर आपल्या झणझणीत कुरकुरीत आणि खमंग अशा अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर एन्जॉय करूया या चिंब पावसात अळूच्या वड्या!!!!!


टिप्स::;

आळुच्या वड्या करताना तुम्ही तांदळाच्या पिठाचा नक्की वापर करा कारण यामुळे वड्या अगदी कुरकुरीत आणि खमंग होतात….

तसेच वड्या केल्यानंतर त्याचे रोल थंड होऊ द्या आणि मगच त्याचे काप करा आणि हळुवार पद्धतीने याची काप करायचे आहे कारण आपल्या रोलचे पान वेगवेगळे व्हायला नको….

त्यामुळे रोल थंड झाल्यानंतर थोडा कडक होतो आणि कापण्यास सोपा जातो…


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:: २०मिनिटे
एकूण वेळ::: ५०मिनिटे
परिमाण:: ३जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11164

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.