मुगाच्या डाळीचे पॅटीस

by Vaishali Chaudhari
1 views

मुगाच्या डाळीचे पॅटीस


प्रस्तावना::

तर बघा मैत्रिणींनो आपण नेहमी बटाट्याची वाटाण्याची वेगवेगळे प्रकारची पॅटीस खातो…. पण आपण आता एक हेल्दी पॅटीस खाणार आहे… तर ते कसे बनवायचे ते आपण पाहू….


साहित्य::

  • अर्धा किलो मुगाची डाळ पाच ते सहा तास भिजत घातलेली
  • वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या
  • बारा हिरव्या मिरच्या
  • एक इंच अद्रकाचा तुकडा
  • दोन मोठे कांदे
  • दोन मोठे टोमॅटो
  • कोथिंबीर
  • एक वाटी चिंचेची चटणी
  • एक वाटी शेव
  • एक चमचा जिरे
  • एक चमचा धनापूर
  • पाव चमचा हळद
  • एक मोठी काकडी
  • चवीप्रमाणे मीठ तेल


कृती:::

सर्वप्रथम पाच ते सहा तास मुगाची डाळ भिजत घालावी ती स्वच्छ धुऊन घ्यावी… त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची एकदम बारीक वाटण करावे…

त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून पातळसर रवण तयार करावे.. त्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये 25 लसूण पाकळ्या अद्रकाचे तुकडे करून घालावे आणि बारा हिरव्या मिरच्या याचे बारीकसर वाटण करावे..

हे वाटण मुगाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये घालावे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे… त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धनापूर थोडी चिरलेली कोथिंबीर आणि काकडी किसून घालावी…..

काकडी घातल्यामुळे आपल्या मुगाची चिले एकदम मऊ येतील…. आता हे आपले रवा तयार झालेले आहे ज्याप्रमाणे तुम्ही डोसा काढतात त्याप्रमाणेच याचेही गोल असे चिले काढून घ्यावे…

चिले काढताना दोघं बाजूने थोडे तेल लावावे… आणि चिले एकदम खरपूस भाजून घ्यावे..

आता आपल्याला दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो बारीक असे चिरून घ्यायचे आहे…

तसेच कोथिंबीर एकदम धुऊन बारीक चिरून घ्यायची आहे…चिले काढल्यानंतर गरम गरम चिल्यावरच चिंचेची चटणी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक शेव घालून त्याचा रोल करावा ……

वरून थोडा चाट मसाला घालावा आणि रोलचे लहान लहान तुकडे करावे… या रोलमध्ये तुम्ही वरून चीज सुद्धा घालू शकतात…

चीज मुळे एक छान चव त्यामध्ये उतरते… ही मुगाचे पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा शेजवान सॉस सोबत किंवा शेंगदाण्याची चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतात…

आणि हे मुलांसाठी पौष्टिक सुद्धा आहे. यामध्ये मी काकडी किसलेली आहे तुम्हाला काकडी घालायची नसल्यास घालू नका…. तसेच काकडी प्रमाणेच तुम्ही गाजर सुद्धा किसून घालू शकतात….


टिप्स:::

चिले करताना तव्यावर रवण पसरल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे आणि मंद आचेवर अगदी एक मिनिट होऊ द्यावे… म्हणजे हे चिले तुटणार नाही…


वेळ व परिमाण::
तयारीशी वेळ::३० मिनिटे
एकूण वेळ ::५०मिनिटे
परिमाण::३ व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

9952

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.