खणखणीत असे खारे शेंगदाणे

by Vaishali Chaudhari
1 views

खणखणीत असे खारे शेंगदाणे


प्रस्तावना::

खारे शेंगदाणे हे फक्त भोळी लोकं तयार करतात असा आपल्याला वाटतं… पण आपण सुद्धा घरी एकदम कुरकुरीत खणखणीत बनवू शकतो… फक्त आपण भेटण्यासाठी वाळू ऐवजी मिठाचा वापर करू….


साहित्य:::

  • एक मोठी वाटी शेंगदाणे
  • एक मोठी वाटी जाड मीठ
  • एक चमचा बारीक मीठ


कृती:::

सर्वप्रथम शेंगदाण्यांमध्ये लांब शेंगदाणे निवडून घ्या…. शेंगदाणे पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घालून एक चमचा मीठ घाला आणि दहा मिनिटे उकळून घ्या…

(तुम्ही शेंगदाणे कुकरमध्ये मीठ घालून दोन ते तीन शिट्ट्या घेऊन सुद्धा उकळून घेऊ शकतात…)

शेंगदाणे उकडल्यामुळे त्यामध्ये योग्य तो खारटपणा येतो… त्यामुळे आपल्या शेंगदाण्याची चव उत्तम लागते…

शेंगदाणे उकडल्यानंतर गाळून घ्या… त्यातील पाणी काढून टाका एका चाळणीत पाणी निथळून घ्या… त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं पंख्याखाली एका रुमालावर शेंगदाणे पसरवून घ्या…

अगदी थोडे कोरडे झाले की मग शेंगदाणे भाजायला घ्या… एका पॅनमध्ये जाड मीठ किंवा इथं तुम्ही बारीक मिठाचा सुद्धा वापर करू शकतात…

माझ्याकडे पूर्वी वापरलेले जाड मीठ होते त्याचाच वापरणे पुन्हा करणार आहे आता पॅनमध्ये मीठ घातले आहे….

त्यामध्ये शेंगदाणे घालून पंधरा ते वीस मिनिटं चांगले खमंग भाजून घ्या…. शेंगदाणे चांगले खमंग भाजले की त्यातील मी चाळणीने गाळून घ्या…..

मीठ चालल्यानंतर शेंगदाणे ताटामध्ये पसरवा आणि थंड करून घ्या… शेंगदाणे एकदम थंडगार झाले की चांगलेच खणखणीत होतात……

आपले बाहेरचे सारखे खमंग असे शेंगदाणे तयार झाले आहे आणि शिवाय व्यवस्थित खारे झाले आहे…. आपले खारे शेंगदाणे तयार झाले आहेत…..


टिप्स::

खारे शेंगदाणे करताना कुकरमध्ये उकडले तरी चालतील कारण त्यामुळे शेंगदाण्यांमध्ये फार चांगला मुरतो आणि शेंगदाणे चांगले खार चट येतात


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:: २०मिनिटे
एकूण वेळ::५० मिनिटे
परिमाण:: २व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8435

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.