स्वीट कॉर्न ची कुरकुरीत भजी
प्रस्तावना:::

भजी पाऊस आला की भजी आपल्याला खूप खावीशी वाटतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी आपण बनवत असतो यामध्ये हा वेगळा प्रकार म्हणजे स्वीट कॉन ची भजी…..
साहित्य:::

- एक स्वीट कॉर्न
- एक मोठी वाटी बेसन
- अर्धी वाटी तांदळाचे पीठ
- एक कांदा
- चार ते पाच जाड हिरव्या मिरच्या
- सात ते सात लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- कोथिंबीर
- पाव चमचा हळद
- एक चमचा ओवा
- चवीप्रमाणे मीठ
- तळण्यासाठी तेल.
कृती:::
सर्वप्रथम स्वीट कॉर्न सोलून घ्या… त्यानंतर सुरीच्या साह्याने स्वीट कॉर्नचे दाणे वेगळे करून घ्या….

स्वीट कॉर्न दाणे वेगळे केले की मग आपल्याला कांदा सोलून चिरून घ्यायचा आहे तसेच मिरचीचे काप करून घ्यायचे आहे….

त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे…. एक मोठी वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचे पीठ एका पातेल्यात घ्या….

त्यामध्ये पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा ओवा अद्रक लसणाची पेस्ट घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या….

त्यामध्ये स्वीट कॉन दाणे घाला…. त्यानंतर चिरलेला कांदा घाला आणि काप केलेल्या मिरच्या घाला…
त्यानंतर त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून भज्यांचे बॅटर भिजवून घ्या हे भजन प्रमाणे एकदम पातळ करायचे नाही घट्टसर राहू द्यायचे…..

यामध्ये तुम्ही एक चमचा कडकडीत तेल घाला आणि मिश्रण एकत्र करून घ्या… त्यानंतर कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा त्यानंतर त्यामध्ये छोटे छोटे भजी काढा ….

आणि भजी कुरकुरीत तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या… आपली खमंग आणि कुरकुरीत स्वीट कॉन चे भजी तयार झालेली आहे….

ही भजी तुम्ही मिरची सोबत टोमॅटो केचप सोबत खाऊ शकतात…..

गरमागरम स्वीट कॉर्नची भजी तयार आहे….
टिप्स:::
भजी तयार करत असताना त्यामध्ये तांदळाचे पीठ अवश्य घालावे त्यामुळे भजी मध्ये खमंगपणा येतो आणि भजी कुरकुरीत बनतात….
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण:::३ व्यक्तींसाठी
