श्रीकृष्ण भगवान यांना नैवेद्यासाठी दाखवला जाणारा फुलोरा
प्रस्तावना::

फुलोरा हा प्रसाद अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याप्रमाणे धना पंजिरी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे हा मैद्याचा फुलोरा तितकाच महत्त्वाचा आहे… हा फुलोरा ज्यावेळेस घट बसतात त्यावेळेस सुद्धा तयार केला जातो त्यावेळेस 51 108 या गणनेत फुलोरा तयार केला जातो आणि देवीजवळ बांधला जातो…
साहित्य ::

- एक वाटी ओली सोजी किंवा मैदा
- चवीप्रमाणे मीठ
- तळण्यासाठी तेल
- पाणी
कृती::
सर्वप्रथम आपण दराबाद तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे गहू अर्धा तास पाण्यात ठेवून ते वाळवून आपण त्याचा रवा पाडून आणतो त्याला सोजी म्हणतात….
त्यापासून लाडू सुद्धा तयार केले जातात दराब्याचा लाडू त्यापासूनच तयार होतो या सोजीचा वापर आपण फुलोरा तयार करण्यासाठी करणार आहे…

एक वाटी सुजी घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला… त्यामध्ये तीन टेबलस्पून इतके तूप घाला हे तूप वितळलेले असावे म्हणजे सुजीला चांगले मोहन बसेल…..

तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसल्यास तेलाचा वापर करायचा या सोजी चा लाडू होईल इतपत तुम्हाला मोहन घालायचे आहे…

त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून कणीक मळून घ्यायची आहे…गोल गोळी करून घ्या…. तसेच त्याच्या ज्याप्रमाणे पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे पुऱ्या लाटून घ्या…
त्यानंतर या पुऱ्यांना फोर्कच्या साह्याने टाचे मारून घ्या…. त्यामुळे आपली पारी फुगणार नाही.. आणि त्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि या पाऱ्या गरम तेलात तळून घ्यायचे आहे…

या पाऱ्या जास्त लाल करायच्या नाही मंद आचेवर तळायच्या… आपल्या नैवेद्याचा फुलोरा तयार झालेला आहे….

आता हा फुलरा ज्यावेळेस आपण कृष्ण जन्माष्टमी ची पूजा करतो त्यावेळेस देवासमोर प्रसादाला ठेवायचा आहे…
त्यानंतर त्याचे तुकडे करून पंजिरी मध्ये कालवायचे आहे या पद्धतीने हा प्रसाद वाटला जातो.,..

आपल्या फुलोऱ्याच्या पाऱ्या या अगदीच खरपूस नसतात पण तुम्हाला खरपूस हव्या असतील तर तुम्ही मोहन जास्त देऊ शकतात….
आपला प्रसादाचा फुलोरा तयार झालेला आहे….
