पंजिरी धनाकूट

by Vaishali Chaudhari
12 views

गोकुळाष्टमी स्पेशल प्रसाद पंजिरी धनाकूट


प्रस्तावना::

श्रीकृष्ण जन्माष्टमीला धण्याची पंजिरी हा प्रसाद आवर्जून लागतो… म्हणजेच आपल्याकडे याला धन्याचे कूट असे म्हटले जाते हे कसे तयार करायचे त्याचे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे…

साहित्य:::

  • एक वाटी धना कूट
  • चार ते पाच बदाम
  • अर्धा इंच सुंठ तुकडा
  • चार ते पाच वेलची
  • अर्धी वाटी गूळ
  • अर्धी वाटी मखाने
  • अर्धी वाटी खडीसाखर
  • एक चमचा तूप


कृती:::

सर्वप्रथम कढईमध्ये अर्धा चमचा तूप घाला त्यामध्ये धना कूटभाजून घ्या… त्यानंतर अर्धा चमचा तूप घालून मखानी खरपूस भाजून घ्या…

त्यानंतर मखाण्याची पूड करून घ्या…….. चार-पाच बदामची तुकडे करून घ्या किंवा कूट करून घ्या…

तसेच सुंठ फोडून घ्या आणि त्याची बारीक अशी पूड करून घ्या… वेलचीची सुद्धा सोलून त्याचे दाणे काढून त्याची बारीक पूड करून घ्या…

गुळ किसून घ्या… आता हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढा आणि धण्याचे कूट मखण्याची कुठ वेलची पूड सर्व साहित्य एकत्र करून घ्या…..

त्यानंतर त्यामध्ये हळूहळू सोडून गूळ घालून घ्या आणि मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या जेणेकरून गोडवा सर्व दूर पसरेल हाताने हळूहळू हे मिश्रण एकजीव करून घ्या…

आपली श्रीकृष्ण जन्माची धना पंजिरी तयार झालेली आहे… हा प्रसाद आपल्या श्रीकृष्ण भगवानांना अत्यंत प्रिय आहे हा प्रसादामध्ये असलाच पाहिजे…

यामध्ये खडीसाखर घाला इथे आपल्याला चौकोनी कडी साखरेचा वापर करायचा आहे….

जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर तुम्ही गूळ ऐवजी खडीसाखरच पुट करून सुद्धा त्यामध्ये तुम्ही घालू शकतात…आणि देवापुढे नैवते दाखवा….

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

12741

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.