विदर्भ स्पेशल झणझणीत टोमॅटोचे भरीत!! पिकलेल्या टोमाटो पासून बनवा भन्नाट भरीत !!!!Tomato Bharit

by Vaishali Chaudhari
9 views

Recipe Name:

विदर्भ स्पेशल झणझणीत टोमॅटोचे भरीत!! !!Tomato Bharit

Photo:


प्रस्तावना/(Introduction)::


विदर्भामध्ये टोमॅटोची आवक ही सर्वात जास्त आहे त्यामुळे सर्व भाज्यांमध्ये तिथे टोमॅटोचा वापर केला जातो…. आणि छानसे टोमॅटो आंबट गोड चवीचे तिथे मिळते…

त्यामुळे वेगवेगळ्या टोमॅटोच्या रेसिपीज तिथे तयार केल्या जातात…. त्यातील एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे पिकलेल्या टोमॅटोची भरीत!!!!


साहित्य(Ingredients)::

  • सात लाल मोठे टोमॅटो
  • तीन मोठ्या जाड्या मिरच्या
  • चार बारीक मिरच्या
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • मीठ


कृती/ (Procedures):::


काय मग मंडळी विदर्भातील स्पेशल रेसिपी बघायची तर सुरू करूया आपण लाल लाल टोमॅटोचे भरीत… लाल लाल मोठे टोमॅटो घ्या ते स्वच्छ धुऊन घ्या…

लाल टोमॅटो छान वांगे भाजणीच्या जाळीवर भाजून घ्यायचे आहेत… हे टोमॅटो भाजण्यासाठी आपण इथे जाळीचा वापर करणार आहे…….

तुमच्याकडे जाळी नसल्यास तुम्ही तव्यावर थोडे तेल टाकून सुद्धा टोमॅटो सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊ शकतात…

.हे टोमॅटो आपल्याला सर्व बाजूंनी छान भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ते चांगले वाफले जातील आणि वरची साल पूर्ण काळी होईल…

सर्व बाजूंनी आपल्याला टोमॅटो चांगले भाजून घ्यायचे आहे…. टोमॅटो त्यामध्ये सुरी घालून बघू चेक करून घ्यायचे आहे टोमॅटो चांगले मऊ झाले की नाही…

झाले की मग टोमॅटो काढून घ्या….. त्यानंतर त्याच जाडीवर आपल्याला मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत….

मिरच्या भाजल्यानंतर त्या काढून घ्यायच्या आहेत… टोमॅटो भाजून झाल्यानंतर ते एका डिश मध्ये काढा त्यामध्ये गरम असतानाच थोडा पाण्याचा हात घेऊन त्यावरील साल काढून घ्या…

सर्व काळी झालेली साल आपण काढून टाकलेली आहे… आता या टोमॅटोचे काप करून घ्या…. एका बडगीमध्ये भाजलेल्या एक मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ हे सर्व मिश्रण चांगले छान असे बारीक ठेचून घ्यायचे आहे…

ज्याप्रमाणे आपण ठेचा तयार करतो त्याचप्रमाणे हाही ठेचा तयार करून घ्यायचा आहे… त्यानंतर त्यामध्ये भाजलेले टोमॅटोचे काप घाला…

आणि टोमॅटो सुद्धा ठेचणीच्या साह्याने चांगले बारीक असे ठेचून घ्या. एकही टोमॅटोचा काप शिल्लक राहू नये या पद्धतीने आपण बारीक असे ठेचून घ्यायचे आहे….

टोमॅटो एकदम चांगले स्मॅश झाले पाहिजे… भरीत चांगले ठेचा यावे यासाठीच आपण टोमॅटोचे काप करून घेतलेले होते….

आता एका कढईमध्ये तेल गरम करा… तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला त्यामध्ये तयार केलेले भरीत घाला …..

आणि चांगले पाच ते सहा मिनिटे परतून घ्या… भरीत परतवून झाल्यानंतर गॅसची आच बंद करा… आपली गरमागरम टोमॅटोचे भरीत तयार झालेले आहे….

हे टोमॅटोचे भरीत तुम्ही पोळी सोबत चपाती सोबत किंवा भाकरी सोबत गरम गरम खाऊ शकतात एकदम झणझणीत आणि आंबट असे हे भरीत लागते….

टोमॅटोच्या भरताची चव एकदम भन्नाट लागते अशी ही भन्नाट टोमॅटो भरताची रेसिपी…..


टिप्स /(Tips)::

लाल टोमॅटो भाजताना तुम्ही तुमच्याकडे जाळी नसल्यास टोमॅटो तव्यावर थोडे तेल घालून त्यावर सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकतात…

तव्यावरही छानसे टोमॅटो भाजले जातात त्यावर झाकण ठेवायचे आहे अधून मधून पलटी करून घ्यायचे आहे सर्व बाजूंनी ते भाजून घ्यायचे आहे….


वेळ व परिमाण (Time & Quantity)


तयारीची वेळ:: १०मिनिट
एकूण वेळ:: ४०मिनिटे
परिमाण:: २व्यक्तींसाठी

टॅग्स / कीवर्ड्स

TomatoBharit #TomatoBharitRecipe #VidarbhaSpecial #VidarbhaRecipe #SpicyTomatoBharit #TomatoRecipe #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #GavranRecipe #VillageStyleRecipe #टोमॅटोभरीत #विदर्भस्पेशल #झणझणीतभरीत #मराठीरेसिपी #गावरानरेसिपी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

15741

Edtiors' Picks

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.