हॉटेल स्टाईल आणि झटपट सोप्या पद्धतीने बनणारी अशी झणझणीत सोयाबीन करी
प्रस्तावना::
सोयाबीन म्हटले की सर्व लहान मुलांना खूपच आवडतात त्यातल्या त्यात मुलांना भाजी हा प्रकार आवडत नाही त्यामुळे या पद्धतीने जर भाजी केल्यास मुलांना चपाती सोबत सहज आवडेल आणि ती आवडीने खातील..
साहित्य:

एक वाटी छोटे सोयाबीन एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा अर्धी वाटी क्रीम पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा धणापूड दोन लवंग दोन मिरे एक हिरवी इलायची एक तेजपान दालचिनीचा छोटा तुकडा मीठ फोडणीसाठी तेल
कृती::
प्रथम सोयाबीन धुवून घ्या. आणि एका पातेल्यामध्ये पाणी आणि मीठ घालून दोन ते तीन उकळ्या आणून सोयाबीन उकडून घ्या .
सोयाबीन नरम झाले की गॅस बंद करा आणि आता आपले सोयाबीन चांगले छान टम्म फुगलेले आहेत. सोयाबीन एका चाळणी मध्ये काढा जेणेकरून त्यातले सगळे पाणी निघून जाईल.
(इथे मी छोट्या सोयाबीनचा वापर केलेला आहे तुम्हाला मोठे सोयाबीन मिळाले तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात. किंवा एका सोयाबीनचे उकडल्यानंतर दोन दोन तुकडे करून घ्या.)
चटणीची कृती:
एक कांदा चिरून घ्या एक टोमॅटो चिरून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये थोडे तेल घाला त्यामध्ये एक इलायची दोन लवंग दोन मिरे दालचिनीचा तुकडा घालून परतून घ्या.
त्यामध्ये कांदा परतून घ्या टोमॅटो परतून घ्या. आणि थोडे पाणी घाला एक ते दोन उकड्या येऊ द्या टोमॅटो आणि कांदा नरम झाला की गॅस बंद करा.
आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी चटणी करून घ्या. यामध्ये थोडे पाणी लागत असल्यास त्याचा वापर तुम्ही करू शकतात. आपली चटणी तयार झाली आहे

पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये थोडी हळद थोडे तिखट आणि मीठ घालून चाळणीतले सोयाबीन त्यात घाला.
आणि सोयाबीन चांगले खमंग असे परतवून घ्या चांगले दोन ते तीन मिनिटे परतून घ्या आणि ते एका डिशमध्ये काढून घ्या.
पॅनमध्ये पुन्हा तेल गरम करून घ्या त्यात जिरे मोहरी घाला एक तेजपान घालून चांगले परतवून घ्या. त्यानंतर आपण तयार केलेली चटणी त्यामध्ये घाला.
चटणी चांगली परतवत राहा. त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा धने पूड घालून मिश्रण चांगले परतवा.
चटणीला तेल सुटेपर्यंत परतवत राहा. त्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी क्रीम घाला. इथे मी घरगुती क्रीम चा वापर केलेला आहे.

एक दिवसाची ताजी साय काढून ती चांगली विस्करने फेटून घेतलेली आहे. तुमच्याकडे नसल्यास तुम्ही आयत्या क्रिमचा सुद्धा वापर करू शकतात.
त्यानंतर दोन वाट्या गरम पाणी करून घ्या दोन वाट्या पाणी याच चटणीच्या मसाल्यामध्ये घाला. आता त्यावर झाकण ठेवून चांगले दोन ते तीन मिनिटे उकळ्या येऊ द्या.
उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये सोयाबीन घाला. सोयाबीन घातल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. मीठ घातल्यानंतर पुन्हा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या.

त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला. आपण इथे पाण्याचा वापर आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे वापर करावा..
मी इथे दोन वाटी पाण्याचा वापर केला आहे तुम्ही दीड वाटी पाण्याचा वापर केला तरी चालेल. आता आपली भाजी तयार झालेली आहे……..
ही सोयाबीन करी तुम्ही फुलक्यांसोबत ज्ञान सोबत तसेच चपाती सोबत खाऊ शकतात…..
मुलांना छोटे छोटे जर फुलके बनवून दिले तर ते एकदम आवडीने खातील….. आणि इथे मी क्रीम अर्धी वाटी वापरलेली आहे ……..
जर लहान मुलांना ही करी बनवत असाल तर तुम्ही एक छोटी वाटी पूर्ण क्रीमचा वापर तुम्ही करू शकता….

टिप्स::
सोयाबीन करी मध्ये वापरली जाणारी क्रीम जर तुम्हाला शक्य असल्यास घरचीच वापरावी कारण ती ताजी आणि चव उत्तम लागते.. आणि फ्रेश क्रीम वापरली जाते…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तींसाठी
