खान्देश स्पेशल ज्वारीची खिशी
प्रस्तावना:::
खिशी चे प्रकार बऱ्याच प्रकारे मध्ये मोडतात.. जशी की नागलीची खिशी, तांदळाची खिशी ,ज्वारीची खिशी…र्वीच्या काळी आम्ही ज्यावेळेस आजीच्या गावाला जायचं त्यावेळेस आमची आजी ज्वारीचे पापड बनवायची….. उन्हाळी सीजन लागला की त्यावेळेस आम्ही गावाला जायचं… सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड तिथे बनवले जायचे त्यातलाच हा एक प्रकार.. गरमागरम अशी चुल्यावर केली जाणारी ज्वारीची खिशी…. आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या ज्वारीचा पापड…. गरमागरम खिशी साठी तर आम्ही सगळे भांडायचं कोणाला किती दिली यावरून भांडण….. किती चुलीवरची खुशी चवीला छान लागायची आणि त्यातल्या त्यात आजीच्या हाताची म्हटलं म्हणजे ……
.

साहित्य::
एक मोठी वाटी खिशीचे पीठ
दोन वाट्या पाणी

तेल
एक वाटी तीळ
चवीप्रमाणे मीठ
कृती::
एका कढईमध्ये दोन वाट्या कडकडीत पाणी गरम करा.. पाण्याला छान उकळी आल्या की मग गॅसची आच बंद करा…
त्यामध्ये ज्वारीचे खिशीचे पीठ घाला.. आणि लाटण्याच्या किंवा रवीच्या साह्याने त्यामध्ये हळूहळू मोडून घ्या….

म्हणजेच घोटून घ्या., पीठ पाण्यामध्ये मोडले जाईल… आणि ज्याप्रमाणे कणकेचा गोळा तयार होतो त्याप्रमाणे गोळा तयार होईल….
जर गोळा कडक वाटत असल्यास तुम्ही अजून अर्धी वाटी किंवा एक वाटी गरम पाणी घाला.. ही मऊ अशी लुसलुशीतच हवी…

पुन्हा अर्धी वाटी पाणी त्यात मोडल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवा आणि मंद आचेवर दोन ते तीन वाफ येऊ द्या.. आता गॅसची आच बंद करा…
.. आता आपली खिशी तयार झालेली आहे ती एका ताटामध्ये काढा….
खिशी ताटामध्ये घातल्यानंतर त्यावर तेल घाला…

आणि सराट्याच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि त्यावर तीळ घाला…. आता आपली गरमागरम लुसलुशीत खिशी तयार झाली आहे…
चला आता मग खिशी आपण एन्जॉय करूया….

खिशीचे पीठ कसे बनवायचे ते आपण बघू
साहित्य::
एक किलो ज्वारी
अर्धा किलो गव्हाचा चिक
पाव किलो साबुदाण्याचे पीठ.
दोन चमचे इतके मीठ
कृती::
इथे ज्वारी चार दिवस भिजू घालायची आहे. रोज पाण्याने ती स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यामध्ये दुसरे पाणी घालायचे आहे…
त्यानंतर चौथ्या दिवशी पाण्याने ज्वारी स्वच्छ धुऊन घ्या आणि ती वाळत घाला. ज्वारी पूर्णपणे सुकल्यानंतर ती गिरणी मधून दळून आणा…
तसेच गव्हाचा चीक तयार करून घ्या म्हणजेच गहू चार दिवस पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्यानंतर स्वच्छ धुऊन घ्या आणि ते मिक्सरवर दळून घ्या….
आणि त्यापासून पांढरा रसाची पाडून घ्या… हा चीक साधारण दोन ते तीन दिवस परत यामध्ये घालून वाळवून घ्या… कोरडा असा चिक तयार होईल…
त्यानंतर ज्वारीचे पीठ आणि तयार झालेला चिक असे सुद्धा चाळणीच्या साह्याने पीठ तयार करून घ्या आणि ते गाळून घ्या हे एकत्र करा…..
आणि त्यामध्ये साबुदाण्याचे पीठ घाला आणि साधारण दोन चमचे इतके मीठ घाला… हे तिघं पीठ मिक्स झाल्यानंतर आपले खिशाचे पीठ तयार झालेले आहे…..
त्यामध्ये मीठ घालण्याची सुद्धा गरज नसते कारण आपण पिठामध्ये मीठ घातलेले आहे… आपले खिशाचे पीठ तयार झालेले आहे…
टिप्स:::
कशी तयार करताना पाणी हे पिठाच्या दुप्पट असते पण ती खाताना घशात अडकू नये म्हणून आपण एक वाटी पाण्याचा जास्त वापर केलेला आहे जेणेकरून खिशी मऊ लुसलुशीत होईल आपल्याला पापड करायचे असतील त्यावेळेस एक वाटी पिठा साठी दोन वाट्या पाणी इतकाच वापर करावा…. आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून मग तुम्ही पापड लाटू शकतात…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :५ मिनिटे
एकूण वेळ :२० मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तींसाठी
