थंडगार असा मठ्ठा

by Vaishali Chaudhari
0 views

थंडगार असा मठ्ठा


प्रस्तावना:::

उन्हाळा लागला केस थंडगार असे कोणतेही पेय प्यावेसे वाटते… त्यामध्ये शरीराला थंड देणारे तसेच पचनही कळणारे थंडीगार पेय म्हणजे मठ्ठा….


साहित्य::

  • अर्धा किलो दही
  • दीड चमचा पुदिना
  • एक चमचा जलजीरा पावडर
  • एक चमचा काळे मीठ किंवा सेंधव मीठ
  • एक चमचा जिरे पावडर
  • पाव चमचा साधे मीठ
  • पाच चमचे साखर
  • अर्धा इंच अदरकाचा तुकडा
  • एक हिरवी मिरची
  • थोडी कोथिंबीर


कृती:::

प्रथम अद्रक साल काढून घ्या…. बारीक असे अद्रक किसून घ्या… मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेले अद्रक एक मिरची पुदिना पावडर जल जीरा पावडर काळे मीठ साखर घालून सर्व बारीक असं पूड करून घ्या…..

( इथे मी साधी मीठ सुद्धा सांगितलेले आहे पण गरज वाटत असल्यास तरच आपल्याला मीठ घालायचे आहे नाहीतर काळे मिठामुळे मठ्ठ्याला चव आलेलीच असते… त्यामुळे शक्यतो गरज पडत नाही…)

याची सर्व बारीक पूड किंवा थोडे पाणी घालून तुम्ही ते पेस्ट करून घेऊ शकतात… त्यानंतर यामध्ये थोडे दही घालून बारीक अशी पेस्ट करून घ्या…

आता ही पेस्ट एका पातेल्यात काढून घ्या… याप्रमाणे पुन्हा थोडे दही घेऊन त्याचीही पेस्ट करून घ्या… तीही पहिल्या मिश्रणामध्ये एकत्र करा…

उरलेल्या सगळ्या दह्याची पेस्ट करून घ्या आणि ते सर्व मिश्रण एकत्र करून घ्या…. आता आपले सर्वे दही फेटून झालेले आहे…

सर्व मिश्रण एकत्र करून घ्या…. त्यामध्ये गरजेप्रमाणे थंडगार पाणी घाला…. आणि मठ्ठा व्यवस्थित एकत्र करून घ्या….

आणि वरून चिरलेली कोथिंबीर घाला…. आता आपला थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे… यामध्ये तुम्ही आईस क्यूब सुद्धा घालू शकतात…

तर मग एन्जॉय करूया थंडगार असा मठ्ठा…..


टिप्स::

इथे मठ्ठा करताना मी पुदिन्याचा पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला फ्रेश पुदिना मिळाला तर तुम्ही फ्रेश पुदिना असता सुद्धा वापर करू शकतात… साधारण दहा ते बारा पाने पुदिन्याची वापरायची….

वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:१५ मिनिटे
परिमाण: चार ते पाच ग्लास

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7324

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.