दही कसे मुरवायचे किंवा लावायचे
प्रस्तावना:::
बरेच जण म्हणत असतात मला दही तयार करता येत नाही… ते कसे तयार करायचे त्याची कृती आपण आता बघणार आहोत…
साहित्य:::
दीड लिटर दूध
अर्धा चमचा दही
कृती:::
इथे फुल पेट क्रीम चे दूध वापरायचे आहे.. इथे तुम्ही गाईची किंवा म्हशीचे कोणतेही दूध वापरू शकतात… दूध हे घट्टसर हवे… आता आपण दूध सर्वप्रथम पूर्णपणे तापवून घेऊ… दूध तापवल्यानंतर दूध थोडे शिजू द्या साधारण पाच ते दहा मिनिटे दूध शिजू द्या… म्हणजे दुधामध्ये घट्टसरपणा येईल… दूध थोडे थंड झाले की मग आपल्या बोटाला गरम पणा सहन होईल इतपत दूध कोमट करायचे आहे …. आता दूध कोमट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा दही घालून चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे…. हे दूध वितकरच्या साह्याने चांगले फेटून घ्या…. किंवा चमच्याच्या साह्याने चांगले एकदम मिक्स करून घ्या…. आता आपल्याला हे चार ते पाच तास झाकण ठेवून मुरण साठी ठेवायचे आहे… उन्हाळ्यामध्ये दही साधारण चार ते पाच तासांमध्ये तयार होते… तसेच हिवाळ्यामध्ये हेच दही तयार होण्यासाठी सात ते आठ किंवा आठ ते नऊ तास लागू शकतात….. चार ते पाच तासानंतर आपले घट्टसर छान असे दही तयार झालेले आहेत…..
टिप्स::: दही लावताना दूध एकदम गार नको… आपल्या बोटाला सहन होईल इतपत ते गरम असावे… त्यामुळे दही चांगले तयार होते
