फोडणीचे वरण

प्रस्तावना:::
नेहमीच प्रश्न पडणारा काय आता स्वयंपाक करावा काय जेवण बनवावे???
प्रत्येक गृहिणी समोर हा प्रश्न उभा राहतो अशा वेळेला झटपट तयार होणारे असे फोडणीचे वरण…. किंवा आपण कधी कधी वरण-भात तयार केलेला असतो त्यावेळेस वरण शिल्लक राहते…. त्यापासून आपण फोडणीचे वरण बनवू शकतो…
साहित्य::
- एक वाटी तुरीच्या डाळीचे वरण
- एक कांदा
- एक टोमॅटो
- दोन हिरव्या मिरच्या
- पाच ते सहा लसूण पाकळ्या
- 8 ते 10 कडीपत्त्याची पाने
- जिरे मोहरी
- अर्धा चमचा तिखट
- चवीप्रमाणे मीठ
- पाव चमचा हिंग
- फोडणीसाठी तेल
कृती:::
सर्वप्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्या.. कुकर मध्ये डाळ शिजवायला लावून दोन ते तीन शिट्या होऊ द्या.. त्याचे वरण तयार करून घ्या..
त्यामध्ये हळद आणि मीठ घाला वरण व्यवस्थित मिक्स करून घ्या.. किंवा तुम्ही इथे उरलेल्या वळण्याचा सुद्धा वापर करू शकतात …..
ज्यावेळेस आपण वरण भातासोबत वरण तयार करतो त्यावेळेस वरण शिल्लक राहून जाते…
अशा वेळेस आपण संध्याकाळी या वाहण्याचा भाजी म्हणून उपयोग करू शकतो किंवा भातावर घेऊन खाऊ शकतो. ….
कढईमध्ये तेल गरम करा त्यामध्ये त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला… त्यामध्ये तेजपान घाला… त्यानंतर त्यामध्ये हिंग घाला…
त्यामध्ये एक चिंच घाला एक गुळाचा खडा घाला आणि व्यवस्थित परतवून घ्या…. त्यामध्ये चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या….

कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट घाला…. मिश्रण परतून झाल्यानंतर त्यामध्ये वरण घाला…..

आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या त्यामध्ये थोडे चवीप्रमाणे मीठ घाला…. मिठाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे कारण आपण वळणामध्ये आधीच हळद आणि मीठ घातलेले आहे…
त्यामुळे जास्त मीठ घालण्याची गरज नाही नाहीतर फोडणीचे वरण खारट होईल…. आता आपल्या वळणाला चांगले दोन ते तीन उकळ्या येऊ द्या….
त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला…. वरणला चांगल्या दोन ते तीन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करा….. आपले फोडणीचे वरण आता तयार झालेले आहे….
हे भातावर किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात…. तर आपले गरमागरम आंबट गोड असे फोडणीचे वरण तयार झालेले आहे….. तर मग एन्जॉय करूया आंबटगोड फोडणीचे वरण….

टिप्स::::
वरण तयार करताना जास्त मीठ घालू नका नाहीतर वरण खारट होईल…. वळणामध्ये मसाला घालण्याची गरज नाही कांदा, टोमॅटो तसेच तेजपान घातल्यामुळे वळणाला एक छान सुगंध येईल…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: ५ मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तींसाठी
