बदाम शेक

by Vaishali Chaudhari
0 views

बदाम शेक

प्रस्तावना:::

बदाम शेक म्हटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते….. बदाम शेक ची रेसिपी एकदम सोपी आहे…. आणि उन्हाळ्यात थंड पेय म्हणून पिण्यासाठी मुलांना करून द्यायला आणि मुलांना खूप आवडते….
साहित्य::: एक लिटर फुल क्रीम दूध अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी साखर दोन फुलं चम्मच कस्टर्ड पावडर

कृती:::


एक लिटर दूध दूध गरम करून घ्या… पूर्णपणे दूध टाकून घ्या.. एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर घालून त्यात अर्धी वाटी दूध घाला आणि व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या…. बदामाचे तुकडे करून घ्या… किंवा बदामाचे काप सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात…. दूध पूर्णपणे तापून झाल्यानंतर त्यामध्ये साखर घाला… अर्धी वाटी घातलेले आहेत… काय आमच्याकडे कमी गोडआवडते… तुम्हाला साखर कमी वाटत असल्यास तुम्ही एक लिटरला एक वाटी साखर घालू शकतो….. आता साखर घातल्यानंतर साखर पूर्णपणे विरघळून घ्या आणि सारखं दूध ढवळत रहा… काय म्हणतात कस्टर्ड पावडरचे गोल त्यामध्ये मिक्स करून घ्या.,.. लगेच मिश्रण मिक्स करायचे आहे नाहीतर कस्टर्ड पावडर च्या गाठी होऊ शकतात….. दूध सतत ढवळत राहायचे आहे…. ही पेस्ट एकदम घट्ट करायचे नाही घट्ट जर झाली तर अजून तुम्ही अर्धी वाटी त्यामध्ये दूध घालू शकता… टोटल एक वाटी दूध मध्ये सुद्धा तुम्ही कस्टर्ड पावडर एकत्र घेऊ शकता…. त्यामुळे गाठी होणार नाही…. आता याला चांगल्या दोन ते तीन उकळ्या येऊ द्या…. आपले दूध चांगले घट्ट झालेले असेल… यामध्ये तुम्ही चार ते पाच केसरच्या काड्या घालू शकतात….. यामुळे दुधाला छान केसरी रंग येतो…. नाही घातले तरी चालेल….. कस्टर्ड पावडर मुळे असाही त्याला रंग येतो… पण केसर चा फ्लेवर छान लागतो…..दोन-तीन उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये बदामाचे काप घाला., बदामाचे तुकडे घाला… बदाम शिक साधारण दोन ते तीन तासासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा….. त्यानंतर ग्लासामध्ये तुम्ही बदाम शेक सर्व्ह करू शकतात… तर एन्जॉय करूया थंडगार बदाम शेक…….

टिप्स:::

दुधामध्ये कस्टर्ड पावडर चे घोल घातल्यानंतर सतत दूध ढवळत रहा… लगेचच ढवळा… नाहीतर कस्टर्ड पावडरच्या गाठी तयार होती….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण ::तीन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7619

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.