कैरीचे आंबट गोड थंडगार असे सरबत

by Vaishali Chaudhari
1 views

कैरीचे आंबट गोड थंडगार असे सरबत


प्रस्तावना:::

उन्हाळ्यामध्ये कैरीचे छान असे सरबत प्यायला मिळते… उन्हाळ्यामध्ये कैरी मिळत असल्यामुळे आपण तयार करू शकतो!!! पण आपण तयार करून ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो!!!


साहित्य :::

  • एक कलमी कैरी किंवा तोतापुरी कैरी
  • दहा ते बारा पुदिन्याची पाने
  • चार चमचे साखर
  • पाव चमचा काळे मीठ
  • पाव चमचा सेंधवमीठ


कृती::

सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुऊन घ्या कैरी सोलून घ्या… कैरीचे लहान लहान काप करून घ्या… कधीच लहान काम केल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी प्युरी तयार करून घ्या….

कैरीचे मिक्सरमध्ये काप केल्यानंतर त्यामध्ये पुदिन्याची पाने साखर घाला काळे मीठ आणि सेंधव मीठ घाला….

आता पुन्हा मिक्सरमध्ये कैरीची पेस्ट फिरवून घ्या त्यामध्ये बर्फाचे तुकडे घाला… म्हणजे कैरीचा रंग तसाच राहील….

आता यामधील पेस्ट एका ग्लासमध्ये घाला आणि त्यामध्ये थंडगार पाणी आणि आई क्यू ब झाला!!! आपले थंडगार असे कैरीचे सरबत तयार झाले आहे…

इथे मी तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे तुम्ही गावरान कैरीचा सुद्धा वापर करू शकता परंतु गावराणी कैरी वापरल्यास आपल्याला साखर जास्त वापरावी लागेल…

इथे गावराणीकरीचा वापर केल्यास दुप्पट प्रमाणामध्ये साखर घालावी… कारण गावराणी पहिली मध्ये जास्त आंबटपणा असतो…

त्यामुळे जवळपास दुपटीमध्ये तुम्ही साखर घालू शकतात….या कैरीच्या सरबतामध्ये तुम्ही पेस्ट ग्लासामध्ये घालून तुम्ही यामध्ये सोड्याचा वापर सुद्धा करू शकता….

हे सरबत तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये भरून साधारण महिनाभर ठेवू शकतात… इथे मी एका कैरीचे प्रमाण दाखवले आहे… खाली मी तुम्हाला एक किलोचे प्रमाण सुद्धा सांगते….


एक किलो कैरीचे सरबत


साहित्य:::

  • एक किलो कलमी कैरी किंवा तोतापुरी
  • अर्धी वाटी पुदिन्याची पाने
  • एक मोठी वाटी साखर
  • दोन चमचे काळे मीठ
  • दीड चमचा सेंधव मीठ


यामध्ये कैरी सोलून घ्या त्याचे काप करून घ्या… आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या.,. त्यानंतर त्यामध्ये पुदिन्याची पाने साखर काळे मीठ सेंधव मीठ घालून ही पुरी पुन्हा फिरवून घ्या…

आपले एक किलो कैरीचे सरबत तयार झालेले आहे… हे तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतात…


टिप्स:::

सरबत तयार करताना पुदिन्याची पाने घातल्यानंतर एक फ्रेशनेस आणि चव एकदम उत्तम लागते!!!

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8771

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.