खानदेश स्पेशल गव्हाची खीर

by Vaishali Chaudhari
0 views

खान्देश स्पेशल गव्हाची खीर


प्रस्तावना:::

गव्हाची खीर ही खान्देशतील स्पेशल अशी गोड स्वीट डिश आहे…. तसेच पितृपक्षामध्ये सुद्धा हि खीर आवर्जून केले जाते….गव्हाच्या खीर मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आपले हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते…

गव्हापासून तयार केली जाणारी आणि चवीला अगदी अप्रतिम लागणारे अशी ही खीर!!!


साहित्य:::

  • पाव किलो गहू
  • 200 ग्रॅम गूळ
  • चार वेलदोडे
  • खोबऱ्याची पतले काप 20 ते 25
  • चिमूटभर मीठ


कृती:::

सर्वप्रथम गहू पाण्यामध्ये अर्धा तास भिजू द्या… त्यानंतर हे गहू चाळणी मध्ये काढा…. चाळणी मध्ये काढल्यानंतर एका रुमालावर ते पसरवा एक पुसून घ्या…

त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला घाव लावून घ्या…. पूर्वी हा घाव खलबत्त्यामध्ये लावत असत.. पण आता आपण मिक्सरमध्ये हळूहळू सिम सिम वर फिरवून गव्हाचे साल काढून घेऊ…

अगदी दोन दोन सेकंद असे आपल्याला सिम सिम वर मिक्सर फिरवायचे आहे आणि ते एका सुपा मध्ये पसरवून घ्यावे…….

किंवा मोठ्या ताटामध्ये पसरवून घ्यावे आणि हाताने चोळून घ्यावे त्याचे साल वेगळे होईल आणि ते पाखडून घ्या त्यातील साल उडून जातील….

आणि आपले गहू कांडली जातील…. कांडप मशीन वरून सुद्धा तुम्ही गहू काढून आणू शकतात…. त्यानंतर पुन्हा अर्धा तास पाण्यामध्ये गहू भिजत घालावे…

आणि कुकरमध्ये गव्हाच्या वर तीन पेर इतके पाणी घालावे किंवा गव्हाच्या तिप्पट पाणी घालावे… आणि साधारण मंद आचेवर अर्धा तास आपल्याला खिरीचे गहू शिजवून घ्यायचे आहे…

पूर्ण अर्धा तास आपल्याला बहु शिकवायचे आहे… त्यानंतर गॅस बंद करून घ्या… आणि नंतर ही खीर आटून घ्या… म्हणजेच खीर रवीच्या साह्याने घोटून घ्या…

त्यानंतर त्यामध्ये 200 ग्रॅम किसलेला गूळ घाला आणि पुन्हा पंधरा ते वीस मिनिटे मंद आचेवर खीर शिजवून घ्या…

वेलदोडे सोलून घ्या आणि वेलदोडे दाणे कुटून घ्या…वेलदोडे पूड खिरीमध्ये घाला… खोबऱ्याचे काप घाला… खोबऱ्याचे काप हे एकदम पतले हवे…..

15 ते 20 मिनिटे खीर शिजवायची आहे….पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर आपली खीर चांगली शिजलेली असेल…

एका चमचा मध्ये घेऊन गव्हाचा दाणा शिजला आहे का ते बघून घ्या नाहीतर अजून दहा मिनिटे फिर शिजवा….

ही गव्हाची खीर अगदी अप्रतिम लागते… या खिरीवर आपण दूध आणि साजूक तूप घेऊन खाऊ शकतो… किंवा नुसती ही आपण खीर खाऊ शकतो….


टिप्स ::

खीर शिजवताना अर्धा तास पूर्ण वेळ गॅसवर शिजू द्यावी नाहीतर गव्हाचे दाणे कच्चेच राहून जातील… आणि आपल्याला ते दाणे कच्चेच वाटत असल्यास पुन्हा दहा मिनिटे गरम पाणी घालून पुन्हा शिजवून घ्यावे…. आपण गुळ टाकल्यानंतर सुद्धा गव्हाची खीर शिजवायची आहे…


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ::५० मिनिटे
एकूण वेळ::२तास
परिमाण::१० व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10880

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.