वालाच्या उसऱ्या
प्रस्तावना/Introduction:::
वालाच्या उसऱ्या हा पारंपारिक प्रकार आहे….हा लग्नाच्या वेळी लहान मुलांच्या कान टोचणी च्या वेळी तसेच पूजेच्या वेळी अशा वेळेस हा प्रकार तयार केला जातो…..वालाच्या उसऱ्या म्हणजे वालाच्या शेंगा सोलून त्या तोडल्या जातात….आणि त्या कोरड्या होईपर्यंत वाळवतात….. वाळल्या नंतर त्याच्या उसऱ्या तयार होतात…..या उसऱ्या ची भाजी केली जाते….

साहित्य/Ingredients::::
- १किलो वालाच्या शेंगा च्या उसऱ्या
- पाव वाटी बोरे (१० ते १२)
- ६ बारीक मिरच्या
- २ जाड मिरच्या
- ८ लसूण पाकळ्या
- कोथिंबीर
- जिरे मोहरी
- पाव चमचा हळद
- पाव चमचा गरम मसाला
- पाव चमचा धनापूड
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी तेल
वालाच्या उसऱ्या कश्या कराव्या /How to make dry raw Sabji?

वालाच्या उसाऱ्या या कश्या कराव्या अगदी सोपे आहे …..वालाच्या शेंगा घ्या ….त्या सोलून त्याच्या शिरा काढून घ्या …..आणि त्या शेंगाचे तुकडे करा…. आणि एका ताटात किवा सुपात सुकण्यासाठी ठेवा …..उन्हात ठेवू नका ….घरात सुकण्यासाठी ठेवा ….पंख्याच्या हवेत अगदी सहज वाळतात ……४ ते ५ दिवस लागतात ……आपल्या वालाच्या उसाऱ्या तयार होतात……या तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकतात ….कधीही भाजी करू शकतात ……
भाजीची पूर्व तयारी/Starting Preparation ::::
सर्वप्रथम उसऱ्या धुऊन घ्या…कारण वाळावतो त्या वेळी त्यामध्ये धूळ उडते….. म्हणून स्वच्छ धुऊन घ्या… नंतर उसऱ्या एका पातेल्यात घालून पाणी घालून १० मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या……. जास्त शिजवायचे नाही…. आणि गॅस बंद करा… पाणी काढून घ्या….आणि शेंगा चाळणीत काढून घ्या…..

भाजीची बनवण्याची कृती/Preparation of Sabji::

कढई मध्ये तेल गरम करून घ्या…. तेल गरम केल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं मोहरी घाला…. नंतर जिरे मोहरी तडतडली की मग त्यामध्ये लसूण पाकळ्या चे काप घाला….

नंतर त्यामध्ये मिरची काप घाला…. मिरचीचे काप घातल्यानंतर तांबूस रंग आला की त्यामध्ये बोरे घाला…..
मग पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनापूड घाला……नंतर वाफलेले शेंगा घाला….

झाकण ठेवून छान ३ मिनिटे वाफ येऊ द्या….. नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…आणि ५ मिनिट वाफ येऊ द्या….

त्यानंतरत्यावर चिरलेली कोथिंबीर घाला….आणि छान ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकतात…..चवीला एकदम अप्रतिम लागते…
.ही भाजी पूजेसाठी केली जाते किंवा अशीही आवडत असल्यास तुम्ही करू शकतात…. लग्नात भराळा भराळी बसवतात त्यांना ही भाजी जेवणात वाढतात……

तसेच लहान मुलाच्या कान टोचनीला ज्या वेळेस देवीच्या आरत्या लावतो त्यावेळेस ही भाजी आवर्जून केली जाते…..

टिप्स/Tips::
ही भाजी तयार करताना शेंगा उन्हात वाळवू नये…..कोरडी होण्यासाठी घरात फॅनच्या हवेमध्ये ठेवाव्या….लवकर वाळतील
वेळ आणि परिमाण/Time and Quantity
तयारी वेळ ::१० मिनिटे
एकूण वेळ:: ४०मिनिटे
परिमाण:: २व्यक्तीसाठी
