चविष्ट असा मेथीचा झुणका

by Vaishali Chaudhari

चविष्ट असा मेथीचा झुणका


प्रस्तावना::

झुणका ही रेसिपी झटपट तयार होणारी आहे ज्यावेळेस आपल्याला भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो त्यावेळेस हा पर्याय एकदम चांगला आहे….. पूर्वी आपल्या आजी झटपट तयार होणाऱ्या अशा रेसिपी नेहमीच करायच्या….


साहित्य::

  • पाव किलो मेथीची एक जोडी,
  • दोन कांदे
  • पाच ते सहा हिरव्या मिरच्या
  • सात ते आठ लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर
  • एक मोठी वाटी बेसन
  • अर्धी वाटी ज्वारीचे पीठ
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी,
  • पाव चमचाहळद
  • अर्धा चमचा तिखट
  • पाव चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा धना पूड
  • चवीप्रमाणे मीठ


कृती::

प्रथम मेथीची जुडी निवडून घ्या तोडून घ्या त्यामध्ये दांड्या राहू देऊ नका नाहीतर कडसरपणा निर्माण होईल. मेथी चांगली दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्या.

त्यानंतर मेथी चिरून घ्या. दोन कांदे सोलून छान बारीक चिरून घ्या.. मिरच्यांचे काप करून घ्या.. लसूण पाकळ्यांचे सुद्धा काप करून घ्या..

आता काम केल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करा त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घाला.. जिरे मोहरी फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि लसणाचे काप घाला ..

आणि चांगले व्यवस्थित परतून घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा घाला चिरलेला कांदा चांगला तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्या…

कांदा चांगला तांबूस रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पूड घालून व्यवस्थित मिश्रण एकजीव करा..

त्यामध्ये त्यानंतर चिरलेली मेथीची भाजी घाला आणि मिश्रण चांगले परतवून घ्या… मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…

आपण या मिश्रणामध्ये बेसनाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ घालून एकत्र करा.. बेसन पीठ एकाच वेळेस सगळे घालणार नाही थोडे थोडे घाला .

आणि व्यवस्थित एकत्र करा… आता पुन्हा थोडे बेसनाचे पीठ आपण घालणार आहे थोडे थोडे घातल्यामुळे ते व्यवस्थित एकत्र होते…

त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित दोन ते तीन मिनिट वाफ येऊ द्या… आता पुन्हा मिश्रण परतून घ्या आणि त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला….

आपला मेथीचा झुणका तयार झालेला आहे…. आपण हमे तिचा झुणका चपाती सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकतो. गरमागरम झुणका एकदमच झक्कास लागतो…..

झुणका ही रेसिपी अगदी दहा मिनिटात ते पंधरा मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे आपण केव्हाही बनवू शकतो…. चला तर मग गरमागरम मेथीचा झुणका खाऊया….

(झुणका होत आल्यावर तुम्ही थोडसं त्यामध्ये तेल सोडू शकतात… तसेच झुणका खाताना वरतून तुम्ही कच्चे तेल घेऊन खाऊ शकतात…..)


टिप्स::

झुणका करताना जर आपल्याला झुणका कोरडा वाटत असल्यास त्यावर पाण्याचा शिपका मारावा आपण इथे ज्वारीचे पीठ यासाठी वापरले आहे की झुणक्याचा गचगचित होऊ नये… ज्वारीचे पीठ वापरल्यामुळे आपला झुणका मोकळा होतो.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :१५मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4787

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.