गुलाबजाम
प्रस्तावना:
गुलाबजाम हा सणावारांना केला जाणारा गोड पदार्थ आहे. लहान मुलांचा तर हा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे.

साहित्य:

- एक किलो खवा,
- एक किलो साखर,
- दोन ग्लास पाणी,
- २०० ग्रॅम मैदा,
- तळण्यासाठी तूप
कृती:
एका परातीत एक किलो खवा घेऊन चांगला मळून घ्या. खव्यामध्ये 200 ग्रॅम मैदा टाकून चांगले मिक्स करून घ्या. खव्याचा चांगला गोळा झाला की त्याचे छोटे छोटे गुलाबजाम वळून घ्या.

एका पातेल्यात एक किलो साखर त्याला दोन ग्लास पाणी घालून साखरेचा पाक करून घ्या. हा पाक पक्का होऊ देऊ नये.
एका कढईमध्ये तूप गरम करून घेऊन तयार केलेले खव्याचे गोळे पाच ते सहा टाकून गुलाबी रंगावर तळून घ्या. असे सर्व गोळे तळून घ्या.

गोळे तळल्यानंतर ते पाकामध्ये सोडा. पाकामध्ये सोडल्यानंतर गुलाबजाम मध्ये पाक चांगला मुरेल.
गुलाबजाम तयार आहे .

टिप्स :
गुलाबजामच्या खव्यामध्ये 200 ग्राम मैदा हा एकदम बरोबर होतो. नरम लुसलुशीत असे गुलाबजाम होतात. या प्रमाणा पेक्षा मैदा कमी जास्त केल्यास गुलाबजाम तुपामध्ये विरघळू शकतात.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: २० मिनिटे
एकूण वेळ: १ तास
परिमाण: १० जणांसाठी
