मुंबई स्पेशल आलू रगडा पापडी(पुरी) चाट

प्रस्तावना::
मुंबईची स्पेशलिटी म्हणजे चाट!!! चाट मध्ये पाणीपुरी आहेस तसेच वेगवेगळ्या प्रकारचे चाट जसे की आलू चाट आलू पापडी चाट, पापडी चाट असे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात आता आपण आलू रगडा पुरी चाट बघणार आहे…
साहित्य:::

- पाणीपुरी पॅकेट एक
- चिरलेला कांदा
- चिरलेली कोथिंबीर
- एक वाटी तिखटबुंदी
- एक वाटी बारीक शेव
- चाट मसाला तिखट
- दोन मोठे बटाटे
- एक वाटी वाटाणे रात्रभर भिजवलेले
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा लाल तिखट
- दोन चिमूट सोडा
- एक पळी तेल
- चवीप्रमाणे मीठ
कृती:::
सर्वप्रथम रात्री वाटाणे पाण्यामध्ये भिजत घाला.. साधारण आठ ते दहा तास भिजतील असे वाटाणे आपल्याला घालायचा आहे…
त्यानंतर सकाळी वाटाणे कुकरमध्ये घालताना धुवून घ्यायचे आहे… धुतल्यानंतर बटाटे सोलून घ्या… बटाट्याची साल काढून घ्या आणि त्याचे काप करून घ्या…
आता कुकरमध्ये वाटाणे आणि चिरलेले बटाटे बुडतील इतपत दीड ते दोन ग्लास पाणी घाला… त्यामध्ये पाव चमचा हळद एक पळी तेल दोन चिमूट इतका सोडा घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या….
आता हे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर साधारण पाच ते सहा शिट्ट्या कुकरच्या होऊ द्या… पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचा गॅस बंद करा…

कुकरची वाफ निघाल्यानंतर कुकर उघडून घ्या आणि आपला वाटाणा शिजला आहे का ते पकडून घ्या… वाटाणा अगदी मऊ शिजलेला असेल…
त्यानंतर स्मॅशरच्या साह्याने बटाटा आणि वाटाणा स्मॅश करून घ्या.. त्यामध्ये पुन्हा एक ग्लास उकडलेले पाणी घाला…
आता पाणी चांगले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि अर्धा चमचा तिखट घाला….

तिखट घातल्यानंतर हा रगडा चांगल्या पाच ते सहा उकड्या येईपर्यंत शिजू द्या… आणि रव्याचा गॅस बंद करा…
आपला पाणीपुरी मधील मुंबई स्टाइल रगडा तयार झालेला आहे.. हा रगडा सर्व्ह करताना गरम गरम सर्व्ह करावा…

आता एका डिश मध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या थोड्या चुरून घ्या… सुरल्यानंतर त्यावर गरमागरम असा रगडा घाला…

त्यावर चिंचेचे आंबट गोड पाणी घाला… त्यावर तिखट बुंदी घाला… बारीक शेव घाला बारीक चिरलेला कांदा घाला आणि कोथिंबीर घाला…
वर चाट मसाला घाला थोडे तिखट घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला…. आपला आलू रगडा पापडी चाट तयार झालेला आहे…

गरमागरम आलू रगडा पापडी (पुरी) चाट…… यावर तुम्हाला आवडत असल्यास गोड दही सुद्धा तुम्ही वापरू शकता…..
तर एन्जॉय करूया गरमागरम आलू रगडा पुरी चाट!!!!

टिप्स:::
रगडा तील वाटाणे चांगले शिजण्यासाठी आपण इथे सोड्याचा वापर केलेला आहे.. तुम्हाला सोडा वापरायचा नसल्यास तुम्ही कुकरच्या शिट्ट्या दोन शिट्या अजून जास्त घेऊन घ्या…
