विदर्भ स्पेशल वांग बटाट्याची झणझणीत अशी भाजी…

by Vaishali Chaudhari
0 views

विदर्भ स्पेशल वांग बटाट्याची आंबट आणि झणझणीत अशी भाजी…

प्रस्तावना::

विदर्भामध्ये कुठलेही कार्यक्रम असो लग्न समारंभ किंवा साक्षगंध अशा कार्यक्रमांना सुद्धा ही भाजी आवर्जून केली जाते….. कुठल्याही कार्यक्रमाला या भाजीचा आस्वाद विदर्भातील लोक घेतात… आज आपण खानदेश भागामध्ये या भाजीचा आस्वाद घेणार आहे… आपल्या स्वाद घरच्या या वेबसाईट मध्ये सर्व प्रकारच्या रेसिपी तुम्हाला मिळतील…..


साहित्य::::

  • दोन वांगी थोडी मोठी
  • तीन बटाटे
  • एक कांदा
  • तीन टोमॅटो
  • तीन हिरव्या बारीक मिरच्या
  • 15 ते 20 कढीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा धनापूर
  • एक चमचा तिखट
  • चवीप्रमाणे मीठ


कृती:::

सर्वप्रथम वांगी आणि बटाटे कापून घ्या…. वांगे आणि बटाटे कापल्यानंतर वांगे बटाटे पाणी गरम करून त्यामधून दोन ते तीन वेळेस धुवून घ्या…

म्हणजे वांग्यात कडवटपणा असल्यास तो निघून जाईल आणि वांग्याची चव चांगली लागेल…. वांगी धुताना तुम्ही थोड्या मिठाचा सुद्धा वापर करू शकतात जेणेकरून वांग्याचा कडसरपणा निघून जाईल…

त्यानंतर कांदा सोलून घ्या तो बारीक चिरून घ्या तसेच तीन टोमॅटो सुद्धा स्वच्छ धुऊन घ्या आणि बारीक चिरून घ्या…

मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण मिरची अर्धा चमचा धणापूड घालून याची पेस्ट करून घ्या… त्यानंतर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घाला ….

साधारण चार पळी इतकी आपल्याला तेल घालायचे आहे… तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घाला…

त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला आणि व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घाला आणि तांबूस रंग येईपर्यंत चांगला परतून घ्या…

आता यामध्ये चिरलेले टोमॅटो घाला त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घालाआणि परतवून घ्या …..

साधारण दोन मिनिटे आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचे आहे त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा तिखट घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या…

आता हे मिश्रण साधारण पाच ते सात मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या… अधून मधून भाजी ढवळत रहा…

व्यवस्थित ढवळल्यानंतर आता यामध्ये अर्धा ग्लास इतके गरम पाणी घाला आणि झाकण ठेवून साधारण सात ते आठ मिनिटे पुन्हा वाफवून घ्या…

त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिश्रण एकत्र करून घ्या पुन्हा एक वाफ काढून गॅस बंद करा..

आता आपली ही विदर्भ स्पेशल वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ती पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली असेल….

तर ही आपण वांग बटाट्याची भाजी चपाती सोबत भातासोबत खाऊ शकतो… विदर्भामध्ये ही भाजी आवर्जून भातासोबत खाल्ली जाते भात भाजी हा प्रकार तिकडे जास्त प्रमाणात खाल्ला जातो….

तर आपण एन्जॉय करूया वांग बटाट्याची विदर्भ स्पेशल भाजी!!!!


टिप्स:::

भाजीमध्ये टोमॅटोचा वापर जास्त केलेला आहे जेणेकरून त्यामध्ये थोडी आंबट चव उतरेल… तुम्हाला जर आंबट चव आवडत नसल्यास तुम्ही इथे दोनच टोमॅटोचा वापर करा…


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::४० मिनिटे
परिमाण:: दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11632

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.