मिंट मोजीतो
प्रस्तावना::
उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंड थंड असे वाटते.. कधीतरी जेवण झाले की आपल्याला थंडगार असेल सोडा युक्त पेय हवे असते….

साहित्य:::

- अर्धी वाटी पुदिना
- एका लिंबाचे चार काप
- एका लिंबाचा रस
- एक चमचा साखर
- स्प्राईट ची बॉटल किंवा सोडा बॉटल
कृती:::
पुदिन्याचे पाने तोडून घ्या… आणि ते स्वच्छ धुऊन घ्या…
पुदिन्याचे पाने एका ग्लासामध्ये घाला त्यामध्ये लिंबूचे काप एक चमचा साखर घाला आणि स्मशरच्या साह्याने ते चेपून घ्या…..

आणि त्यामध्ये स्प्राईट ड्रिंक घाला…. आपले मिंट मोजीतो तयार झालेले आहे.. यामध्ये तुम्ही थोडे काळे मीठ घालू शकता…

किंवा तुम्हाला आवडत असल्यास थोडा चाट मसाला चा वापर करू शकतात.. आणि तुम्हाला पुदिना चेपून घ्यायचा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा पुदिना आणि साखर फिरवून घेऊ शकतात…
आणि ग्लासात घालताना थोडे पुदिनाचे पाणी घाला… आता त्यामध्ये चार ते पाच थंडगार आईस क्यूब घाला… आपले थंडगार असे मिंट मोजीतो तयार झाले आहे…
यामध्ये थोड्या तुम्ही हिरवा रंग घालू शकतात.. पण मी रंगा चा वापर केलेला नाही…. तुम्ही मिक्सरमध्ये पुदिना फिरवल्यानंतर नॅचरल हिरवा रंग आपल्या मोजीतोला येईलच..
आणि वरून पुदिन्याची पाने घाला… आता आपल्या ग्लासाला अर्धी लिंबाचा काप करून ग्लासाला लावा….
मिंट मोजीतो….!!!!!!

तुम्हाला स्प्राईट बॉटल नाही मिळाल्यास तुम्ही साध्या सोड्याचा वापर करू शकता किंवा सेवनाचा सुद्धा वापर करू शकता….
