उरलेल्या पोळ्यांचा मनोरा किंवा चिवडा
प्रस्तावना::
कधीकधी पोळ्या बऱ्याचदा शिल्लक राहतात कधी कोणी कमी खातं कधी कोणी जास्त खातं त्यामुळे पोळ्या शिल्लक राहतात आता या उरलेल्या पोळ्या पासून आपल्याला काय काय रेसिपी बनवता येईल जेणेकरून त्या पोळ्या वाया जाणार नाही!!! तर आज आपण पोळ्यांचा चिवडा किंवा मनोहरा बघणार आहे!!!
साहित्य::
दोन पोळ्या एक मोठा कांदा चार हिरव्या मिरच्या एक कढीपत्त्याचा पान दहा ते बारा शेंगदाणे पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी तेल जिरे मोहरी

कृती::




सर्वप्रथम पोळीचा एकदम हाताने चोळून चुरा करून घ्यायचा.. किंवा तुकडे करून तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात… आता या चोर यामध्ये पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या… मात्र बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवावे नाहीतर मिक्सरचे पाते खराब होतात… कांदा बारीक चिरून घ्या मिरच्यांचे साफ करून घ्या… कडे मध्ये तेल घाला त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला त्यामध्ये मिरच्या शेंगदाणे आणि कढीपत्ता घालून परतवून घ्या… त्यानंतर त्यामध्ये कांदा चांगला तांबूच रंग येईपर्यंत परतून घ्या… कांदा चांगला तांबूस रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये पोळीचा चुरा घाला… आणि व्यवस्थित खालचे वरचे पत्रिका घ्या… हातावर झाकण ठेवून एक ते दोन वाफ येऊ द्या… थोड्या पाण्याचा शिपका तुम्ही यावर मारू शकतात.. मनोरा एकदम मऊ झालेला आहे…. गरमागरम झटपट असा मनोरा तयार आहे…. कधी काही भाजी नसल्यास तुम्ही पटकन तयार करू शकणारा असा मेनू आहे… एन्जॉय करूया गरमागरम मनोरा किंवा पोळ्यांचा चिवडा किंवा भूगरा!!! तुमच्या भागामध्ये या रेसिपीला काय म्हणतात नक्की सांगा!!!

टिप्स:: मनोरा करताना पाण्याचा शिपका जरूर मारावा त्यामुळे मनोरा मऊ सद होतो…

वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकुण वेळ:२० मिनिटे
परिमाण::१ व्यक्तीसाठी
