फक्त 250 ग्रॅम काजू पासून 350 ग्रॅम बनणारी काजू-कतली
प्रस्तावना:::
बऱ्याचदा काजू-कतली बनवताना अनेक अडचणी येतात काजू-कतली ही सर्वांनाच आवडते…. आता ती झटपट कशी बनवायची आणि एकदम कडक पण होऊ नये आणि एकदम छान अशी कतली व्हावी…. असे सर्वांना वाटत असते….
साहित्य:::
250 ग्रॅम काजू 100 ग्राम साखर एक चमचा साजूक तूप
कृती:::
सर्वप्रथम काजू आणल्यानंतर ते फ्रीजरमध्ये साधारण चार ते पाच तास ठेवावे… त्यामुळे ते कडक होतील….
त्यानंतर थोडे थोडे काजू घेऊन मिक्सरवर अगदी सिम सिम वर फिरवावे… म्हणजेच मिक्सर सारखे चालवू नये… त्यामुळे काजूला तेल सुटेल…

बंद सुरू बंद सुरू या पद्धतीने मिक्सरवर काजू फिरवावे… तुमची बारी कशी पूड तयार होईल… असे करत थोडे थोडे काजू करूनच फिरवावे.. सर्व 250 ग्रॅम काजू या पद्धतीने फिरवून घ्यावे…..
त्यानंतर चाळणीच्या साह्याने हे गाळून घ्यावे… आणि जाड भरडा पुन्हा मिक्सरवर सिम सिम पद्धतीने फिरवून घ्यावे….

आता एका कढईमध्ये साखर घालावी त्यामध्ये अगदी थोडे पाणी घालावे… साखर ओली होईल इतपतच आपण पाणी घालावे….
त्यानंतर त्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर अगदी एक ते दोन उघड्या येऊ द्याव्यात… एकतारी पेक्षा कमी पाक असला तरी चालेल…

एकतारी पाक जरी झाला तरी लगेचच काजूची पूड त्यामध्ये घालून एकत्र करावे… आणि सतत मिश्रण ढवळावे… आजूबाजूने तूप सोडावे..

काजूचा गोळा तयार झाला आणि मिश्रण खाली कडक होऊ लागले की समजावे आपले काजुकतली चे मिश्रण तयार झालेले आहेत….
गोळा असा तयार होईल… जास्त जर आपण गॅसवर राहू दिलास तर तो कडक होईल…. त्यातला थोडा गोळा हातावर घेऊन त्याची गोडी तयार होते का हे बघा…
त्या मिश्रणाची जर गोळी तयार झाली तर आपले मिश्रण झाले असे समजावे की दुसरी पद्धत आहे… गोडी तयार झाली म्हणजे आपली कतली तयार होऊ शकते….
आता एका पॉलिथिन बॅग ला तूप लावावे….. व त्यावर काजू-कतलीचा गोळा घालावा आणि चांगला मळून घ्यावा…. त्यानंतर लाटण्याच्या साह्याने तो गोळा लाटून घ्यावा…

आपल्याला जितकी बारीक हवी त्या तितकी आपण लाटावे… आणि सुरीला थोडे तूप लावून त्याच्या छान शंकरपाळ्याच्या आकारांमध्ये कतल्या कापून घ्यावे….

छान अशी स्क्वेअर मध्ये आपली काजू कतली तयार होईल…. थोड्यावेळ ही खाती पतली अशीच राहू द्या लगेचच ती सेट होईल… एकदम छान अशी कसली आपली तयार होईल….

साधारणतः 250 ग्रॅम पासून आपल्याला साडेतीनशे ग्रॅम इतकी काजुकतली तयार होते…. ज्यांना जास्त गोड आवडते त्यांनी सव्वाशे ग्राम(१२५ग्रॅम )साखर टाकली तरी चालेल…
मी ते कमी साखरेचा वापर केलेला आहे… मी शंभर ग्राम साखरेचाच इथे वापर केलेला आहे.…..

टिप्स:::
कतली तयार करताना मिक्सर अगदी सिम सिम वरच फिरवावे… नाहीतर काजूला तेल सुटून काजूचे मिश्रण बारीक होणार नाही….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण:: ३५० ग्रॅम
