उपवासाची कढी

by Vaishali Chaudhari
5 views

उपवासाची कढी


प्रस्तावना:::

आपण नेहमी कढी तर बनवतोस पण उपवासाची कढी सुद्धा एकदम चविष्ट लागते तसेच ही कढी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि कमी जिन्नस मध्ये ही कढी झटपट बनते फक्त उपवासालात नाही तर आपण एरवी सुद्धा ही कढी तयार करू शकतो…


साहित्य :::::

  • एक मोठी वाटी दही
  • पाव वाटी शेंगदाणे
  • अर्धा चमचा जिरे,
  • एक बारीक मिरची,
  • दोन जाड मिरची,
  • कढीपत्त्याची पाने
  • साजूक तूप एक चमचा
  • आणि चवीप्रमाणे मीठ
  • पाणी


कृती:::

सर्वप्रथम पाव वाटी शेंगदाणे गरम पाण्यामध्ये भिजत घाला साधारण वीस मिनिटे आपल्याला शेंगदाणे भिजत घालायचे आहे…

शेंगदाण्यांवरील साल काढून घ्या… मिक्सरच्या भांड्यामध्ये दही शेंगदाणे 1/4 चमचा जिरे एक बारीक हिरवी मिरची याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्या…

हे मिश्रण अगदी बारीक झाले पाहिजे त्यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे राहायला नको… त्यानंतर हे मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून एक ग्लास पाणी घालून पातळ करून घ्या….

एका पातेल्यामध्ये एक चमचा साजूक तूप घाला… तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणीला जिरे घाला…

आणि कढीपत्त्याची पाने आणि दोन जाड मिरचीचे काप घाला… आता मिरची आणि कढीपत्ता चांगला परतल्यानंतर. त्यामध्ये आपण जे दह्याचे मिश्रण तयार केले आहे ते घाला …..

आणि मिश्रण सतत ढवळत रहा… आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…

आपल्या कडीला दोन ते तीन उकळ्या आल्या की मग गॅस बंद करा… आपली उपवासाची कढी तयार झालेली आहे…


टिप्स:::

दही आपल्याला थोडे आंबटच वापरायचे आहे त्यामुळे कढीची चव छान लागेल… आपण इथे शेंगदाण्याचा वापर यासाठी केला आहे की कढीला घट्टपणा प्राप्त व्हावा….

इथे तुम्हाला कढी जर जास्त घट्ट आवडत असल्यास पाव वाटी शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही थोडे शेंगदाणे अजून घालू शकतात…..


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ::१०मिनिटे
एकूण वेळ:: २५मिनिटे
परिमाण:: २व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10995

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.