कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले)

by Vaishali Chaudhari
1 views

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले)


प्रस्तावना:::

कटेले ही पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे… ही भाजी अत्यंत दुर्मिळ असते त्यामुळे ती सहजासहजी उपलब्ध होत नाही पण पावसाळ्यामध्ये शेतकरी बांधव ही भाजी आवर्जून विकण्यासाठी आणतात… ही भाजी एक ते दोन वेळा नक्की खावी यामध्ये खूप प्रकारचे विटामिन्स असतात…


साहित्य:::

  • अर्धा किलो कटेले
  • पाच हिरव्या मिरच्या जाड
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा धनापुर
  • पाव चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा जाड भरड तिखट
  • साधारण दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • कोथिंबीर


कृती:::

सर्वप्रथम कटेली छान धुवून घ्या त्याचे काप करून घ्या… कटेले कापण्यासाठी भरपूर वेळ लागतो…. त्यानंतर कोथिंबीर चिरून घ्या मिरचीचे काप करून घ्या आणि नंतर लसणाची सुद्धा काप करून घ्या….

कढईमध्ये तीन ते चार पोळ्या तीळ घालून कडकडीत गरम करा…. त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घाला …

त्यानंतर लसणाची काप आणि मिरचीचे काप व्यवस्थित परतून घ्या…… त्यानंतर कटेले घाला आणि व्यवस्थित भाजी परतून घ्या…

त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धणापूड गरम मसाला पाव चमचा आणि अर्धा चमचा इतके जाड भरडे मिरचीचे तिखट घालून भाजी व्यवस्थित परतून घ्या…

त्यानंतर पाच ते सात मिनिटे आपल्याला झाकण ठेवून भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे…. त्यानंतर अधून मधून भाजी उघडून एकत्र घ्यायची आहे….

त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घाला तसेच दोन चमचे शेंगदाण्याचे कूट घाला…

(शेंगदाण्याचे कूट करताना शेंगदाणे भाजून घ्या त्याची साल काढून त्याचे जाडभर शेंगदाण्याचे कूट तयार करून ठेवा)

त्यानंतर आपल्याला पुन्हा पाच ते सात मिनिटे भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे… आता आपली भाजी चांगली शिकलेली असेल त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला …..

आणि ही भाजी तुम्ही पोळी सोबत किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतात ज्वारीच्या भाकरी सोबत ही भाजी खाऊ शकतात आरोग्यदायी अशी कटुल्यांची भाजी!!!!


टिप्स:::

भाजी शिजवत असताना मीठ सर्वात शेवटी घालावे कारण भाजी शिजण्यास वेळ लागतो मीठ जर आधीच घातले तर भाजी लवकर शिजणार नाही…


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ: २०मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण:: ३ व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11829

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.