अळूच्या पानांची किंवा पोथीच्या पानांचे कुरकुरीत अशी भजी

by Vaishali Chaudhari
0 views

अळूच्या पानांची किंवा पोथीच्या पानांचे कुरकुरीत अशी भजी


प्रस्तावना::

आतापर्यंत अळूच्या पानांची भजी ही तुम्ही पानाचे तुकडे करून तयार केले असतील… आता हा वेगळा एक प्रकार मी दाखवणार आहे ज्यामध्ये आपल्याला पान खाताना कोणीही वेगळे करत नाही. बऱ्याचदा ज्यावेळेस आपण पानांच्या तुकड्यांची भजी करतो त्यावेळेस बरेच व्यक्ती वरचा बेसनाचा लेअर खाऊन त्यातील मधील पान काढून टाकतात… पण या पद्धतीने भजी केल्यास ती चविष्ट ही लागतील आणि संपूर्ण खाल्ली जातील… आणि जेणेकरून आपल्याला अळूच्या पानांमधील विटामिन आपल्याला सर्व मिळतील… अळूच्या पानाला बरेच जण पोथीचे पान असे सुद्धा म्हणतात….


साहित्य:

  • १० अळूची पाने
  • एक मोठी वाटी बेसन
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अदरकाचा तुकडा
  • पाच ते सहा हिरव्या मिरच्या किंवा कोड्या झालेल्या मिरच्यांचा जाडा भरडा तिखटएक चमचा
  • चिमूटभर हळद
  • अर्धा चमचा धनापूर
  • अर्धा चमचा ओवा
  • चिमूटभर सोडा
  • अर्धा लिंबू
  • मीठ
  • चिरलेली कोथिंबीर
  • तळण्यासाठी तेल


कृती:::

सर्वप्रथम अळूच्या सर्व शिरा काढून घ्या…. अळूच्या पानांच्या सर्व शिळ्या काढून घ्यायच्या नाही तर त्या घसा पकडतील…

घसामध्ये अळूच्या पानांमुळे बऱ्याचदा खवखव होते.. त्या शिरा आपल्याला संपूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे…

आणि ज्याप्रमाणे आपण कांदा बारीक चिरतो त्याप्रमाणे पोथीचे पानांच्या तुकडे करून बारीक चिरून घ्यायची आहे….

अद्रक लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे.. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे…. आता चिरलेले अळूचे पान एका पातेल्यामध्ये घालून त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला एक चमचा तिखट घाला चिमूटभर हळद घाला अर्धा चमचा धनापूड घाला…

अर्धा चमचा ओवा घाला… चिरलेली कोथिंबीर घाला..त्यानंतर त्यामध्ये पाणी घाला आणि बेसन पीठ भिजवून घ्या….

सर्व पीठ भिजवून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चिमूट इतका सोडा घाला आणि त्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या ..

आता सोडा चांगला फस्ट फसवून देईल तो हळुवारपणे मिक्स करून घ्या… जोरजोरात मिक्स करू नका…. आता कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा…

आणि छान बारीक बारीक भजी काढून घ्या… आपल्या अळूच्या पानांची झणझणीत अशी गरमागरम कुरकुरीत भजी तयार झालेली आहे…

हा नवीन प्रकार तुम्ही नक्की करून बघा.. आपली ही अळूच्या पानांची भजी अत्यंत कुरकुरीत होतात…. ज्या पद्धतीने आपण मिश्रण भिजवलेले आहे त्या पद्धतीची भजी खूप छान होती नक्की करून बघा!!!!!

अळूच्या पानांची किंवा पतीच्या पानांची कुरकुरीत भजी तयार आहे!!!!


टिप्स:::

सोडा ज्याप्रमाणे दोन चिमटी सांगितला तितकाच घाला जास्त घातल्यास भजी तेलकट होतील… तुमचे मिश्रण किती आहे तुम्ही जर वाटी छोटी घेतली असल्यास एकच चिमटीत सोड्याचा वापर करा…


वेळ आणि परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण:: चार ते पाच व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8068

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.