उडदाच्या पापडांचा खमंग असा कुरकुरीत असा खुळा

प्रस्तावना:::
खुळा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते.. सर्व लहान मुलांना कोरडी चटणी घातलेला खुळा अत्यंत आवडतो… आज डब्याला काय द्यायचे अगं आई!!! खुळापोळी दे!!! असे कित्येक मुलं म्हणतात…!!!!!
साहित्य:::

- दोन ते तीन उडदाचे पापड
- तेल
- अर्धी वाटी इतकी कोरडी लसूण शेंगदाण्याची चटणी
कृती:::
सर्वप्रथम उडदाच्या पापडाची चार तुकडे करून घ्या… इथे माझ्याकडे साधे उडदाचे पापड आहे तुमच्याकडे लसूण मिरचीचे पापड असले तरी चालतील….
लसूण मिरचीचे पापड्यांचे चव अजून छान झणझणीत लागते… आता आपण पापडाची चार तुकडे करून घेऊ.. कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम करून घ्या..
त्यामध्ये दोन दोन तुकडे करून पापड तळून घ्या… आता या पद्धतीने आपल्याला सर्व तुकडे तळून घ्यायचे आहे…. पापडाचे तुकडे तळल्यानंतर ते थंड होऊ द्या..

त्यानंतर एका डिशमध्ये पापडाचा चुरा तयार करून घ्या हाताने तोच चुरून घ्या आणि त्यावर कोरडी चटणी घाला…
हे पापड तेलामध्ये तळल्यामुळे आपल्याला वरून वेगळे तेल घालण्याची आवश्यकता नाही… इथे मी तळलेल्या पापडांचा खुळा केला आहे…

याच पद्धतीने तुम्ही भाजलेल्या पापड्यांचा सुद्धा खुळा बनवू शकतात…. त्यावर फक्त वरून तेल घ्यावे लागते…
हा उडदाच्या पापडाचा खुळा तुम्ही आमरस पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतात… कारण आपण कधी कधी भाजी बनवत नाही अशा वेळेस हा पापडांचा खुळा उपयोगी पडतो…

मुलांच्या डब्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने बनवल्या जाणारा… अगदी घाई मध्ये सुद्धा हा लगेच तयार होतो त्यामुळे आपला डबा लगेच बनतो… तर आता एन्जॉय करूया उडदाच्या पापडांचा खुळा…!!!!!
