पुलाव::: पावभाजी पुलाव

by Vaishali Chaudhari
1 views

पुलाव::: पावभाजी पुलाव


प्रस्तावना::

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव तयार करत असतो… पण आपण कधी बाहेर जातो त्यावेळेस ज्यावेळेस रेडिमेट पावभाजी आपण घेतो त्यावेळेस तिथे पुलाव सुद्धा असतो पण तो कसा बनवला जातो कोणत्या पद्धतीने बनवला जातो ती रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे…..

त्याला येणाऱ्या लाल रंग हा नॅचरल पद्धतीने आपण आपल्या पुलावला कसा आणू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे….पावभाजी पुलाव ही नवीनच रेसिपी आपण आज बघणार आहे…


साहित्य::

  • एक वाटी बासमती तांदूळ
  • दोन मोठे कांदे
  • एक मोठा बटाटा
  • दोन जाड हिरव्या मिरच्या
  • , कोथिंबीर
  • अर्धी वाटी वाटाणे
  • सात ते आठ लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच धरकाचा तुकडा
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा गरम मसाला
  • एक चमचा तिखट
  • अर्धा चमचा धनापूर
  • फोडणीसाठी जिरे मोहरी
  • दीड चमचा पावभाजी मसाला
  • चवीप्रमाणे मीठ
  • फोडणीसाठी तेल


कृती::

सर्वप्रथम ज्याप्रमाणे आपण भात शिजवतो त्याप्रमाणे बासमती तांदळाच्या भात शिजवून घ्यावा.. बासमती तांदूळ जुना असल्या साधारण पंधरा मिनिटात आधी तो भिजत घालावा त्यानंतर दोन शिट्या घेऊन भात शिजवून घ्यावा…

आपल्याला मोकळा करायचा आहे.. एक कांदा लांबुळका कापायचा आहे तसेच बटाटा सुद्धा लांबोळका काप आपल्याला करायचे आहे…

एखादा नेहमीप्रमाणे भाजीला चिरतो त्याप्रमाणे चिरायचा आहे… लसूण आणि अद्रकाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे…

सर्वप्रथम कढईमध्ये तेल घेऊन बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत….

तसेच कांद्याची लांबी काप सुद्धा तळून घ्यायचे आहेत ….

जाड मिरच्यांचे मधून काप करून ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत…

वाटाणे सुद्धा तळून घ्यायचे आहेत ….

कढईमध्ये तेल राहू देऊन त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घाला अद्रक लसणाची पेस्ट घाला….

पाव चमचा हळद तसेच पावभाजी मसाला गरम मसाला तिखट घालून तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या…. परतवल्यानंतर यामध्ये थोडे पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घाला…

जर तुम्हाला बाहेरच्या सारखा लाल रंग हवाअसेल आवडत असेल… अर्ध्या बीटाचा ज्यूस काढून तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे…

त्यामुळे पुलावाला एकदम नॅचरल लाल रंग येईल… त्यानंतर आपल्या बासमती तांदळाच्या भात एका मोठ्या भांड्यामध्ये मोकळा करून त्यामध्ये तयार केलेले मिश्रण घाला…..

त्यानंतर तळलेले बटाटे तळलेले कांद्याचे काप तळलेल्या हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला…

आणि थोडी पावभाजी असल्यास अगदी थोडी अर्धी वाटी पावभाजी त्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकतात किंवा नाही केली तरी चालेल ….

कारण आपण पावभाजीची ग्रेव्ही तयारच केलेली आहे ती आपण त्यामध्ये मिक्स केलेले आहे..,.. आपला पावभाजी पुलाव तयार झालेला आहे… तर आपण एन्जॉय करूया पावभाजी पुलाव!!!!


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ::३० मिनिटे
एकूण वेळ:: ५०मिनिटे
परिमाण::४ व्यक्तींसाठी
टिप्स::: पावभाजी मसाला तयार करताना तुम्ही त्यामध्ये थोडी पावभाजी असल्यास ती सुद्धा करू शकतात…

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

9956

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.