कुरकुरीत झणझणीत मसाला भेंडी
प्रस्तावना:::

मुलांना एकच प्रकार भाजीचा खाऊन खूप कंटाळा येतो… मुलांना दरवेळेस काहीतरी नवीन हवे असते… अशा वेळेस आपण भेंडीचा जर वेगळ्या प्रकार बनवला तर मुलं आवडीने खातील… ती भेंडी तर चटपटीत लागली तर मुले आवडीने चपाती सोबत खातील…
साहित्य:::

- पाव किलो भेंडी
- पाव वाटी शेंगदाणे
- सात ते आठ लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- दोन हिरव्या मिरच्या
- पाव चमचा तिखट
- पाव चमचा हळद
- पाव चमचा धनापूर
- पाव चमचा गरम मसाला
- चवीप्रमाणे मीठ
- कोथिंबीर
- जिरे मोहरी
- फोडणीसाठी तेल
कृती:::
सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुऊन घ्या त्याची लांब असे काप करून घ्या साधारण एका भेंडीचे आठ तुकडे होतील या पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहे….

आणि लहान भेंडी असल्यास तिचे चार काप केले तरी चालतील…. त्यानंतर अद्रक लसणाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे…
त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्या त्या शेंगदाण्याची साल काढून शेंगदाण्याचे मिक्सरमध्ये कूट करून घ्या…. नंतर कढईमध्ये साधारण दोन ते तीन पळ्या इतके तेल घाला तेल गरम झाले की,,
त्यामध्ये जिरे मोहरी फोडणीला घाला आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत त्याचे काप करून घाला त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घाला…

यामध्ये भेंडीचे काप घाला.. मिश्रण व्यवस्थित परतून घ्या त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धनापूर पाव चमचा तिखट घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या…

त्यानंतर झाकण ठेवून एक ते दोन मिनिटे वाफ घेऊन घ्या… त्यानंतर झाकण काढून घ्या नंतर झाकण ठेवायचे नाही…
त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि शेंगदाण्याचे कूट घाला… आणि भेंडी सतत ढवळत रहा सर्व बाजूने मंद आचेवर ती साधारण दहा मिनिटे खरपूस परतू द्या..
शेंगदाण्याच्या कुटामुळे भेंडीला एक खरपूसपणा येईल… आणि मंद आचेवर भेंडी दहा मिनिटे परतवत राहा त्यामुळे ती खमंग होईल आपण इथे या भाजीमध्ये तेलाचा वापर जास्त केलेला आहे……

त्यामुळे भाजीला खमंगपणा येईल…. पंधरा मिनिटे झाले की गॅस बंद करा आपली भाजी चांगली खमंग झणझणीत अशी तयार झालेली असेल…
ही खरपूस अशी भाजी चपाती सोबत एकदम चवदार लागते आणि मुले अगदी आवडीने खातात यावर चिरलेली कोथिंबीर सुद्धा घाला…
आपली खमंग खरपूस झणझणीत मसाला भेंडी तयार आहे…
टिप्स:::
भेंडी वापरत असताना आपण सुरुवातीला त्यावर दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेणार आहे त्यानंतर भेंडीवर झाकण ठेवायचे नाही कारण जास्त वेळ झाकण ठेवल्यामुळे भेंडी चिकट होते… त्यानंतर भेंडी बिना झाकणाचीच मंद आचेवर परतवायची आहे….
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ ::१०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण:: २व्यक्तींसाठी
