बेसन लाडू

by Vaishali Chaudhari
275 views

रेसिपीचे नाव: बेसन लाडू

प्रस्तावना

बेसनाचे लाडू हा पारंपारिक लाडू आहे आपले आजीचा खास पदार्थ जसा की मोतीचूर लाडू

  • बेसन अर्धा किलो,
  • पाव किलो साखर,
  • पाणी, तूप तळण्यासाठी,
  • वेलची पूड,
  • काजू-बदामचे काप.

सर्वप्रथम बेसन घेऊन ते एका तगारीमध्ये घाला. गुठळ्या मोडून घ्या.

त्यामध्ये वितळलेले गरम तूप घाला. ते सर्व बेसनाला व्यवस्थित चोळून घ्या. म्हणजे बेसनाला मोहन बसेल.

मोहन दिल्यानंतर पाणी घालून त्याचा कडक सर गोळा तयार करून घ्या.. गोळा तयार झाला की त्याला थोडे तुपाचा हात लावा.

आता त्याची गोल गोल गोळे करून घ्या. आता हे आता हे बेसनाचे गोळे ज्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे पुऱ्या लाटून घ्या.

एका कढईमध्ये तूप गरम करा. तूप गरम झाले की त्यामध्ये एक एक पुरी घालून तळून घ्या. पुरी ही तांबूस रंगावर तळा.

चांगली खरपूस होऊ द्या. ठरलेल्या पुऱ्या थंड होऊ द्या. आता एका पातेल्यामध्ये साखर घ्या. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला.

साखर वितळले की मग त्याचा एक तारी पाक करून घ्या. थोडासा बोटाला हात लावून त्याचा तार होतो का ते बघून घ्या.

हा पाक झाला की गॅस बंद करा. दुसऱ्या साईडला आपण ज्या पुऱ्या केलेल्या आहे त्या एकेक मिक्सरमध्ये घालून त्याचा बारीक भुगा करून घ्या.

आता हा केलेला भुगा पाकामध्ये घाला. पुन्हा गॅस थोडासा चालू करून त्याचा गोळा होईपर्यंत हलवत रहा.

एक चमचा आजूबाजूंनी तूप सोडा. आता गॅस बंद करा. मिश्रण जास्त कडक होऊ देऊ नये. लाडू कडक होतील.

मध्यम ठेवल्यास लाडू मऊसुद राहतील. आता या मिश्रणामध्ये काजू बदाम वेलची पूड घालून एकत्र करा.

आता हाताला तूप लावून छान छोटे छोटे लाडू वळून घ्या. हे लाडू साधारण सात ते आठ दिवस बाहेर राहतात.

नंतर साठवणूक करायची असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात.. आपले बेसन पुरीचे लाडू तयार आहे…..

साखरेचा पाक पक्का होऊ देऊ नका. पाक पक्का झालाकी लाडू कडक होतील.

तयारीची वेळ – 30 मिनीटे

एकूण वेळ – १ तास १५ मिनीटे

परिमाण – साधारण २०-२५ लाडू

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7507

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.