🥘 १. रेसिपीचं नाव
रतलामी शेव
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —
✨ ३. प्रस्तावना
हा पदार्थ चवीला अत्यंत तिखट असतात. रतलाम शेव हे नाव तिखट मसालेदार शेव होय.
📝 ४. साहित्य (Ingredients
- १ किलो बेसन,
- १ किलो तेल,,
- ५० ग्रॅम लाल तिखट,
- २० ग्रॅम ओवग
- १० ग्रॅम हिंग,
- ५० ग्रॅम मीठ,
- मसाला (मसाला – १० मिरे, १५ लवंग, २ बाज्या, १ दालचिनी तुकडा, १ तुकडा सुंठे या सर्वाची बारीक पूड करणे)
🔥 ५. कृती (Steps)
एक किलो बेसन एका तगारीमध्ये काढून घ्या. बेसन पसरवून घ्या. आता बेसनामध्ये गुठळ्या असल्यास त्या हाताने मोडून घ्या.
बेसनामध्ये पन्नास ग्राम तिखट 20 ग्रॅम ओवा, दहा ग्रॅम हिंग, 50 ग्रॅम मीठ, दहा ग्रॅम गरम मसाला हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
पीठ सर्व दूर मिक्स झाले पाहिजे. इथे गरम मसाला मध्ये काय काय घालायचे आहे ते मी वरती साहित्यामध्ये दाखवलेलेच आहे.
जर तुम्हाला आयता गरम मसाला वापरायचा असेल तर तुम्ही सुहाना गरम मसाल्याची पुडी किंवा एव्हरेज गरम मसाल्याची पुडी दहा ग्रॅमची आणून ती घालू शकतात.
आता ज्या बेसनामध्ये आपण सर्व साहित्य घातलेले आहे. या बेसनाला मध्यभागी आळे करून घ्या. त्यामध्ये एक ग्लास तेल घाला.
त्या तेलावरच एक ग्लास पाणीही घाला. एक ग्लास तेल आणि एक ग्लास पाणी हे मिश्रण फेटून घ्या. हे मिश्रण चांगले फेटा तेल आणि पाणी एकत्र झाले पाहिजे.
हे एकत्र झालेल्या मिश्रणामध्ये हळूहळू बेसन मिक्स करत घ्या. आता मिश्रणाचा थोडी थोडी पाणी घालून गोळा मळून घ्या.

गोळा नरम बनवा. या मिश्रणाचा गोळा नरम यासाठी की आपण साच्यामधून शेवगाळण्यास आपल्याला सोपे जाईल.
आणि शेव ही नरम येतील. आता एका मोठ्या कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. साधारण एक किलो तेल कढईमध्ये घालून घ्या.
तेल कडकडीत गरम झाली का? हे बघा त्यामध्ये एक शेवाचा तुकडा टाका. तेल चांगले कडकडीत तापले की मग त्या शेवाची चकती गाळा.

आता मंद आचेवर आणि शेवटची चकती अल्टी पलटी करून चांगली तळून घ्या. शेव जास्त लाल करायची नाही.
कारण लाल केल्यानंतर त्याच्यामध्ये कडसाडपणा येतो. त्याची चव थोडी कडवट लागते. अशी करत थोडे थोडे सारण साच्यामध्ये भरून साधारण दहा ते बारा चकत्या तळून होतील.
त्या सर्व चकत्या तुम्ही तळून घ्या. जास्त लालकट होऊ द्यायचे नाहीत. जास्त तापलेल्या तेलामध्ये ते लाल होऊ शकते.
गॅसची आच अधून मधून कमी जास्त (मध्यम) आच करावी.. याप्रमाणे सर्व मिश्रणाची शेव तळून घ्या. शेव एका कागदावर पसरवून घ्या.

नंतर हवाबंद डब्यामध्ये ते भरून ठेवा.नंतर त्या चकतीचे तुकडे करून डब्यामध्ये भरावे….. आता आपली रतलामी झणझणीत शेव तयार आहेत…

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
हे शेव सकाळी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकतात. भेळमध्ये ही घालून खाऊ शकतात.
🕒 ८. वेळ व परिमाण
• तयारीची वेळ: २० मिनिटे
• लागणारा वेळ: ३० मिनिटे
• एकूण वेळ: ५५ मिनिटे
• परिमाण:
❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी
