शंकरपाळे

by Vaishali Chaudhari

रेसिपीचे नाव शंकरपाळे

प्रस्तावना :

शंकरपाळे हा गोड पदार्थ असून चवीला शंकरपाळे हा अत्यत खमंग, गरमागरम चहासोबत खाता येईल

साहित्य:

  • 200 म्हशीचे तूप ग्रॅम
  • पाणी,
  • मीठ.
  • १ किलो मैदा,
  • 300 ग्रॅम पीठीसाखर,
  • १ किलो तेल

कृती :-

1 किलो मैदा चाळून घ्या. मैदयामध्ये चिमूटभर मीठ घाला, नंतर 200 ग्रॅम तूप विलून घ्या ते तूप मैद्यात् घालून मैदा चोळा म्हणजे मोहन छान बसेल. नंतर पीठीसाखर घालून चोळून चोळून घ्या.

नंतर पाणी टाकून गोळा करून घ्या. पोळी पाटावर लुटून घ्या शंकरपाळे कटरने कट करून घ्या, शंकरपाळे पाहीजे त्या आकारात कापा,

एका कढाईत तेल गरम कुरुन घ्या त्यान शंकरपाळे थोडे थोडे थोडे घालून तळून घ्या शंकरपाळू गुलाबी रंगावर तळा छान खुसखुशीत होतात.

टिप्स

शंकरपाळ्यात साखरेची प्रमाण ५० ग्रॅमु वाढवू शकतात परतू जास्त घालू नका, शंकरपाळे वितळतात तेलकट होतात.

सयारीची वेळ – 30 मिनीटे.

एकूण वेळ १ तास ३० मिनीटे. ‘परिमाण १ ते दिड विज्ञा

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.