काजू कतली

प्रस्तावना :
काजू कतली हा सणासुदीला केला जाणारा गोड पदार्थ आहे.
साहित्य :-
- ५०० ग्रॅम काजू
- ४०० ग्रॅम साखर
- १० ग्रॅम केसर मसाला,
- पाणी
कृती –
प्रथम काजू फिज मध्ये ठेवा
फ्रिजमधील काजूचे एकदम बारीक पीठ होते.
मिक्सरमध्ये काजु थोडे थोडे बारीक करा मिक्सर लगातार सुरु ठेवू नका.
बंद चालू करत कुट करा
नंतर एका कढाईत साखर घालून ती ओली होईल इतपत पाणी घाला.
आणि एकतारी पाक होईपर्यंत ढवळत रहा
काजू चे पीठ चाळणीने गाळून घ्या.
नंतर गाळलेले काजूपीठ पाकात घाला
केसर पुडी घाला.
काजुच्या मिश्रणाचा गोळा झाला की एका प्लाटीक पेपरला तूप लावा व गोळा चांगला मळून घ्या.
लाटण्याच्या साहाय्याने पातळ अशी पोळी लाटा.
नंतर चाकू, सुरीने चौकोनी वड्या पाडून घ्या.
आवडत असल्यास चांदीचा वर्क लावा
टिप्सः- मला मिठाईमध्ये चांदीचा वर्क वापरलेला आवडत नाही.
मिक्सरमध्ये काजु थोडे थोडे बारीक करा मिक्सर लगातार सुरु ठेवू नका कारण त्याने काजूला तेल सुटेल चालू ,बंद करत पूड,कुट करा
वेळ व परिमाण
एकू तयारीची वेळ – २५ मिनीटे
एकूण वेळ १ तासू
परिमाण – १ किलो
