कोरडी डीऱ्यांची भाजी

प्रस्तावना आपण डीऱ्यांची पातळ भाजी तर बघितलीच होती आता आपण त्याचीच कोरडी भाजी सुद्धा बघू जी चवीला अप्रतिम लागते आणि काहीतरी वेगळ्या चवीची तसेच भरपूर फायबर संयुक्त अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा…. यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर्स मिळतात….
साहित्य:::

- एक जुडी डीऱ्या
- दोन चमचे शेंगदाण्याचे कूट
- दोन बारीक मिरच्या
- चार लसूण पाकळ्या
- कोथिंबीर
- पाव वाटी तुरीची डाळ
- जिरे मोहरी
- पाव चमचा हळद
- पाव चमचा धना पूड
- पाव चमचा गरम मसाला
- फोडणीसाठी तेल
- चवीप्रमाणे मीठ
कृती:::
डीऱ्यांची भाजी ही स्वच्छ धुऊन घ्यावी आणि जाड दांड्या थोड्या काढून घ्याव्यात बाकीच्या राहू द्याव्या…
दांड्या सहित ती बारीक चिरून घ्यावी… आणि कुकरमध्ये भाजी घालून दीड ग्लास पाणी घालून दोन शिट्ट्या कुकरच्या घ्याव्यात…

त्यानंतर तुरीची डाळ पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घालून शिजवून घ्यावी डाळ जास्त शिजवू नये दाणे दाणे हवी…
त्यानंतर दोन शिट्या झाल्यानंतर कुकरचा गॅस बंद करावा आणि भाजी एका पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी आणि मग ती चाळणीत काढावी…

त्यातील सर्व पाणी दाबून काढून घ्यावे आणि भाजी मोकळी करावी…. त्यानंतर कढईमध्ये तेल घालावे त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घालावी मिरचीचे बारीक काप करून घ्यावे …

ते घालावे लसणाची काप घालावे ते व्यवस्थित परतवून घ्यावे…. त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धना पूड पाव चमचा गरम मसाला घालावा…..
त्यामध्ये उकळलेली डीऱ्या ची भाजी घालावी…. त्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घ्यावी..m नंतर त्यामध्ये तुरीची डाळ घालावी…

आणि भजी कोरडी झाली की त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालावे… त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे आणि दोन ते तीन मिनिटे चांगली वाफ येऊ द्यावी….
भाजीला चांगली वाफ आल्यानंतर भाजी व्यवस्थित एकत्र करून घ्यावी आणि मग त्यावर चिरलेली कोथिंबीर घालावी….

आपली डीऱ्यांची भाजी तयार आहे ही तुम्ही भाकरी सोबत पोळी सोबत चपाती सोबत खाऊ शकतात… ही भाजी सीजनल आहे ही फक्त पावसाळ्याच्या वेळेस मिळते त्यावेळेस अवश्य घेऊन खावी…
ही भाजी शक्यतो गावाकडे शेतकरी असतात ते विकतात त्यांच्याकडे मिळते….

टिप्स:::
आता आपल्याकडे तुरीची डाळ आपण शिजवताना कुकरमध्ये लावू शकतो परंतु अगदी एक सिटी घ्यावी नाहीतर तुरीची डाळ वरण शिजवून जाईल म्हणजेच ती पूर्ण विरघळून जाईल म्हणून पातेल्यात शिजवली तर डाळ राहील….
वेळ व परिमाण
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::२ व्यक्तींसाठी
