कच्च्या केळीची भाजी: उपवासाठी

by Vaishali Chaudhari
402 views

🥘 १. रेसिपीचं नाव

कच्च्या केळीची भाजी [उपवासासाठी]

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

३. प्रस्तावना

ही एक सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे

पोषक तत्वे: कच्च्या केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. त्यामुळे

आरोग्यदायी:  बटाट्याऐवजी कच्च्या केळ्याचा आहारात खास करून उपवासाच्या दिवशी समावेश करणे फायदेशीर ठरते. 

पचन सुधारते: 
कच्च्या केळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनासाठी उत्तम आहे.  कच्च्या केळ्यामध्ये फायबर (तंतूमय पदार्थ) मोठ्या प्रमाणात असल्याने पचन सुधारण्यास मदत होते

📝 ४. साहित्य (Ingredients

  • एक फणी केळे (६ केळे)
  • ४ बारीक मिस्ची,
  • १ जाड मिरची,
  • १ चमचा जीरे,
  • भाजलेले शेंगदाणे,
  • तेल,
  • मीठ

🔥 ५. कृती (Steps)

  • कच्ची केळीची भाजी ही उपवासाला केली जाणारी भाजी आहे तर आता आपण कृती पाहूया. कच्ची केळी सर्वप्रथम घेऊन घ्या कारण त्याला चीक असतो. एका केळ्याचे साधारण दोन दोन तुकडे करा.
  • एका पातेल्यात अर्धे पातेले पाणी घ्या त्यामध्ये तुकडे केलेली केळी घाला. किडी साधारण नरम होईपर्यंत म्हणजेच दहा मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या. केळी चांगली नरम झाली आहे की नाही हे सुरीच्या साह्याने बघा.
  • चांगली नरम झाली असल्यास गॅस बंद करा केळी एका डिशमध्ये काढून घ्या आणि पाणी फेकून द्या. कच्ची केळी सोलून घ्या. कच्च्या केळीचे गोल चकत्यांप्रमाणे कापू शकतात किंवा आपल्याला आवडत असल्यास तर चौकोनी आकारामध्ये कापून घ्या.
  • जाड मिरची आणि बारीक मिरचीचे ही आपण कापून घ्यावी. गरम तव्यावर मंद आचेवर चांगले खरपूस शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाण्याचे साल काढून घ्या. आता शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक असे कूट करून घ्या
  • . एका कढईमध्ये साधारण चार पळ्या तेल घालून त्यामध्ये जिरे फोडणी घाला. त्यामध्ये कापलेली जाड मिरची आणि बारीक मिरचीचे काप घाला चांगले परतवून घ्या. मिरच्या चांगल्या लाल खरपूस झाल्यानंतर त्यामध्ये आपण कापलेल्या केळीचे काप घाला.
  • आणि चांगले खरपूस पाच मिनिटे परतवत राहा. हे मंद आचेवर परतवावे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि पुन्हा परतून घ्या. सर्वात शेवटी आपण त्यामध्ये शेंगदाण्याची कूट घालणार आहोत. आता केळ्याची भाजी चांगली एक मिनिट परतवून घ्या .
  • ती खमंग होईल इतपर्यंत परतावा. केळ्याच्या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचे कूट सर्वात शेवटी घातले याचे कारण असे की शेंगदाण्याचे कूट जर लवकर घातले तर ते करपून जाईल त्यामुळे भाजी कडसर लागेल.
  • शेंगदाण्याची कूट घातल्यानंतर भाजी जास्त परतून नका. केळ्याची भाजी तयार आहे यावर तुम्ही लिंबू घेऊन खाऊ शकतात भाजी अत्यंत रुचकर लागते आणि बनवण्यासही सोपी आहे.

💡 ६. टिप्स (Cooking Tips):

केळाची भाजी वाफवताना केळ्यांचे दोन दोन तुकडे केले किती पटकन वाफते. तसेच आपण कुकरमध्येही हे वाफवू शकतो पण एक किंवा दोनच शिट्या होऊ द्या कारण ते जास्तच नरम होऊ शकतात त्यामुळे भाजीचा गोळा तयार होईल. म्हणून आपण पातेल्यात शिजवले तर आपल्याला ते सारखे बघता येईल की कितपत नरम हवे जास्त नरम झाल्यास भाजीची चव वेगळी लागते.

कच्ची केळी

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

कच्ची केळीची भाजी

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे.

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

कच्च्या केळ्याच्या भाजीचे फायदे:

  • पचन सुधारते: कच्च्या केळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनासाठी उत्तम आहे. 
  • आरोग्यदायी: बटाट्याऐवजी कच्च्या केळ्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. 

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11644

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.