बारीक शेव (Zero ) झिरो

by Vaishali Chaudhari
89 views

🥘 १. रेसिपीचं नाव

बारीक शेव (Zero ) झिरो

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

३. प्रस्तावना

बारीक शेव हे बऱ्याच पदार्थावर सर्व्हिगसाठी वापरतात. चाट मध्ये बारीक शेव वापरले जातात. चाट हा सर्वाना आवडणारा असल्याने चाट मध्ये बारीक शेव हवेच

📝 ४. साहित्य (Ingredients

  • बेसन (हरबरा डाळ पीठ ) – १ किलो,
  • तेल १ किलो.
  • नमक- मीठ ५० ग्रॅम,
  • पाणी

🔥 ५. कृती (Steps)

सर्वप्रथम बेसनात (हरबरा डाळ पीठ ) मीठ घालावे व एकत्र करावे.

बेसनात आळ करून घ्या ५० ग्रॅम तेल त्यात अर्धा ग्लास पाणी घालून फेटून घ्या.

नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्ट‌सर गोळा करा करा बारीक शेवांचा गोळा, हा घट्ट हवा.

कढाईत तेल गरम करावे.

नंतर साच्याना झिरो नंबरची चकती लावून गोळा भरावा

तेलात शेव टाकावी,

याप्रमाणे याप्रमाणे बाकी मिश्रणाची तळून शेव काढून घ्यावी.

(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

बारीक शेवामध्ये सोड्याची गरजच नाही. तसेच मोहन प्रमाण कमी घेतले तरी चालते कारण ती कडक असल्यास चवीला छान लागतात.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागते.

🕒 ८. वेळ व परिमाण

• २० मिनीटे

एकूण वेळ -१ तास १५ मिनीटे

परिमाण -१० जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11632

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.