रेसिपीचे नाव –
रवा लाडू
प्रस्तावना :
- रवा लाडू हा पारंपारिक गोड पदार्थ आहे रवा लाडू हा सणांना केला पदार्थ
साहित्य:
- १ किलो रवा बारीक,
- पाव किलो तूप
- अर्धा किलो साखर,
- सात-आठ वेलची पूड
- १ वाटी काजू तुकडा,
- अर्धा वाटी बदाम
- पाणी
कृती :-
कढाईत खा प्रथम भाजा.
नंतर कढाईत तूप घाला.
त्यात रवा घालून भाजा अर्धा किलो साखर पातेल्यात घालून त्यात एक ग्लास पाणी घालून एक तारी पाक करा.
एका कढाईत थोड्या तूपात काजू बदाम तुकडा भाजून घ्या.
कढाईत रव्यात साखरेचा पाक व काजू बदाम तुकडे घालून छान गोळा होऊ दया.
गॅस बंद करा.
नंतर वेलदोडे पूड घाला थंड झाल्यावर त्याचे लाडू वळा.
टिप्स :-
साखरेचा पाक एकतारी पाक करताना जास्त घट्ट होऊ देऊ नका. लाडू कडक होतील.
वेळ :
तयारीची वेळ एकूण वेळ 30 मिनीटे १ तास.
