रेसिपीचे नाव: बेसन लाडू
प्रस्तावना
बेसनाचे लाडू हा पारंपारिक लाडू आहे आपले आजीचा खास पदार्थ जसा की मोतीचूर लाडू
साहित्य :
- बेसन अर्धा किलो,
- पाव किलो साखर,
- पाणी, तूप तळण्यासाठी,
- वेलची पूड,
- काजू-बदामचे काप.
कृती :-
सर्वप्रथम बेसन घेऊन त्यात थोडे गरम तूप घाला, नंतर बेसन पीठ चांगले चोळून घ्यावे व त्यात पाणी घालून गोळा बनवा.
गोळा झाला की पुऱ्या लाटून घ्या.
कढाईत तूप गरम करून घ्या त्यात ह्या पुऱ्या खरपूस तळून घ्यावे
तळलेल्या पूऱ्या थंड झालेनंतर मिवसरमधून पुऱ्या खरपूस तळून घ्या.
एका पातेल्यात साखर घेऊन त्यात एका अर्धा ग्लास पाणी घालून एक दारेचा पाक करून घ्या.
हा पाक पुऱ्याच्या चुऱ्यामध्ये घाला हा पुऱ्याचा चुरा पाकासह थोड़ा गॅसवर ठेवून गोळा होईपर्यंत हलवा.
गॅस बंद करा. मिश्रण गार झाले की त्यात काजू बदाम काप वेलची पूड घालून एकत्र करा व त्याचे लाडू वळा
टिप्स :-
साखरेचा पनक पक्का होऊ देऊ नका. पाक पक्का झालाकी लाडू कडक होतील.
तयारीची वेळ – 30 मिनीटे
एकूण वेळ – १ तास १५ मिनीटे
परिमाण – साधारण २०-२५ लाडू
