चना चाट झटपट बनणारा आणि तोंडाला चव आणणारा

by Vaishali Chaudhari
0 views

डाएट स्पेशल चना चाट झटपट बनणारा आणि तोंडाला चव आणणारा


प्रस्तावना::

डायट करण्यासाठी काय काय फूड खावे हा प्रत्येक कला प्रश्न पडतो… सकाळच्या नाश्त्याला चना चाट हा उत्तम ऑप्शन आहे….
साहित्य:: एक वाटी रात्रभर भिजवलेले हरभरे एक कांदा मोठा एक टोमॅटो मोठा कोथिंबीर एक चमचा चाट मसाला एक चमचा तिखट एक चमचा मीठ अर्धा लिंबू

कृती:::

रात्री हरभरे पाण्यामध्ये भिजत घाला… रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर सात ते आठ तास साधारण आपल्याला हरभरे भिजवायचे आहे… आणि कुकरमध्ये हरभऱ्याच्या दुपटीने पाणी घालून सहा ते सात शिट्या होऊ द्या म्हणजे हरभरे एकदम मऊ होतील आणि पचना हलके जातील… हरभरे जर जुने असतील तर तुम्ही त्यामध्ये चिमूटभर सोडा सुद्धा घालू शकता… कुकरमध्ये हरभरे शिजवून घ्या…. त्यानंतर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य बारीक चिरून घ्या… कुकर मधील हरभऱ्यांमधील पाणी वेगळे काढा… चणे वेगळ्या बाजूला चाळणीमध्ये काढा… त्यानंतर ते एका बाऊलमध्ये काढा… आता या वाफवलेल्या चण्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेली टोमॅटो चिरलेली कोथिंबीर घाला… त्यामध्ये एक चमचा चाट मसाला एक चमचा तिखट एक चमचा मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करून घ्या…. त्यानंतर त्याला थोड्याशा आंबटपणासाठी आपल्याला अर्धा लिंबू घालायचा आहे… अर्ध्या लिंबापेक्षा तुम्हाला जास्त आवडत असल्यास तुम्ही संपूर्ण लिंबू सुद्धा त्यामध्ये घालू शकतात…. आणि हे सर्व साहित्य एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या… चाट मसाला ही तुम्हाला जास्त आवडत असल्यास वरून सुद्धा तुम्ही चाट मसाला घेऊ शकतात…. आपला बाहेरील प्रमाणे चणाच्या तयार झालेला आहे…. हा चार्ट चना चाट तुम्ही डायट साठी वापरू शकतात… जर तुम्हाला डायट साठी वापरायचा नसतात त्यावर तुम्ही बारीक शेव घेऊन सुद्धा खाऊ शकतात…. यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स मिळतील…. चला तर मग एन्जॉय करूया आपण चना चाट…… वाचनाचा एका झटपट होतो की लहान मुले सुद्धा तयार करू शकतात… फक्त त्यामध्ये आपल्याला त्यांना चणे शिजवून द्यावे लागतील आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून द्यावी लागेल..

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7997

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.