राजगिऱ्याचा शिरा – उपवासाची झटपट रेसिपी (Rajgira Shira Recipe in Marathi)

15 views

उपवासासाठी अगदी साधा सोपा असा राजगिऱ्याचा शिरा झटपट होणारा!!!!Rajgeera Shira


रेसिपी नाव(Racipe Name)::


राजगिरा शिरा

रेसिपीचा फोटो (Racipe Photo)::

राजगिऱ्याचा शिरा – उपवासाची झटपट रेसिपी (Rajgira Shira Recipe in Marathi)


प्रस्तावना (Introduction)::


आता घटस्थापनेचे उपवास सुरू होतील… अनवले उपवास केले जातात… अनवले म्हणजे मीठ न खाताच म्हणजेच आपल्याला मिठाचा वापर न करता तयार केलेले पदार्थ….. यामध्ये बरेच गोड पदार्थ सुद्धा तयार होतात…

तसेच मीठ न घालता काही पदार्थ आपण तळून सुद्धा खाऊ शकतो…. यामध्ये आपण वेगवेगळ्या कंद मुलांचा शिरा तयार करू शकतो… त्यातलाच आपण एक प्रकार पाहणार आहे आपण गोड म्हणजे राजगिऱ्याचा शिरा…. हा शिरा पचनासाठी सुद्धा हलका असतो आणि पटकनही पचतो….


साहित्य: (Ingridident)::

राजगिऱ्याचा शिरा – उपवासाची झटपट रेसिपी (Rajgira Shira Recipe in Marathi) – फोटो 2
  • एक मोठी वाटी राजगिरा
  • अर्धी वाटी दूध
  • पाव वाटी किसलेला गूळ किवा साखर
  • चार ते पाच बदाम
  • चार ते पाच काजू
  • चार ते पाच किसमिस
  • दोन ते तीन चमचे साजूक तूप


शिरा बनवण्याची कृती (Preparation of Rajgeera Shira)::


राजगिऱ्याचा शिरा बनवला हा एकदम सोपा आहे तो इतका झटपट तयार होतो की तुम्हाला बाहेरून काही आणायची गरज नाही…..

तुम्ही रोजही खाल्ला तर तो आरोग्यासाठी चांगला असतो आणि लहान मुलांना तर तो अत्यंत आवडतो…..

कारण हा लहान मुलांच्या पत्नीसाठी एकदा हलका असतो…..प्रथम आपल्या घरामध्ये राजगिरा असल्यास कढई गरम करून त्यामध्ये राजगिरा फोडून घ्या….

आणि त्यातील आकर सुद्धा काढून घ्या… किंवा आता रेडीमेड राजगिऱ्याच्या फोडलेल्या लाह्या मिळतात त्या सुद्धा तुम्ही शिऱ्यासाठी वापरू शकतात…

राजगिराचा शिरा बनवण्यासाठी गुळ पाव वाटी किसून घ्या…

तसेच काजू आणि बदामचे तुकडे किवा बारीक कप करून घ्या …..

सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात हा वेळ विरघळून घेऊ पाणी गरम करून त्यात गूळ घालून गुळाचे पाणी तयार करून घ्या…,.

नंतर हे गुळाचे पाणी गाळून घ्या….. कढईमध्ये साजूक तूप गरम करून घ्या…. त्यामध्ये काजू-बदामाचे काप आणि मनुका घाला….

राजगिऱ्याचा शिरा – उपवासाची झटपट रेसिपी (Rajgira Shira Recipe in Marathi) – फोटो 5

काजू बदाम आणि मनुका चांगल्या परतल्या की मग त्यामध्ये राजगिरा झाला आणि तो चांगला परतवून घ्या…..

राजगिऱ्याचा शिरा – उपवासाची झटपट रेसिपी (Rajgira Shira Recipe in Marathi) – फोटो 6

त्यानंतर त्यामध्ये तयार केलेले गुळाचे पाणी घाला आणि अर्धी वाटी तूप घाला… आता हे मिश्रण चांगले गोळा होईपर्यंत शिजू द्या…

राजगिऱ्याचा शिरा – उपवासाची झटपट रेसिपी (Rajgira Shira Recipe in Marathi) – फोटो 7

राजगिरा लगेचच शिजतो…. त्यानंतर चिरायचा गॅस बंद करा आपल्या शिरा लगेचच तयार होईल… बंद करा आणि अजून वरून काजू-बदामाचे काप घालून आपल्या गरमागरम राजगिऱ्याचा शिरा तयार झालेला आहे…..

शिरा करत असताना मी ते गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला गुळ आवडत नसल्यास तुम्ही साखर घातली तरी चालेल जर तुम्ही साखर वापरत असल्यास पाणी घालायची गरज नाही त्या ऐवजी तुम्ही दीड वाटी या प्रमाणामध्ये दूधच घालू शकतात….

साखर घालताना ज्यावेळेस आपण राजगिरा घालतो लगेचच साखर घाला आणि त्यामध्ये दूध घाला आणि छान गोळा होईपर्यंत तयार होऊ द्या आपला राजगिऱ्याचा शिरा तयार होईल…..

राजगिऱ्याचा शिरा – उपवासाची झटपट रेसिपी (Rajgira Shira Recipe in Marathi) – फोटो 8


टिप्स::Tips::


शिरा तयार करताना राजगिऱ्याच्या लाह्यांचा तुम्ही वापर करायचा…. पिठाचा वापर करू नये कारण पिठाचा शिरा हा चिकट लागतो त्यामुळे फोडलेल्या लाह्यांचा शिरा हा रवेदार आणि चवीला सुरूस लागतो….


वेळ आणि परिमाण (Time and Quantity)::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:: १५मिनिटे
परिमाण:: १व्यक्तींसाठी


टॅग्स आणि कीवर्ड (Tags/ Keyword)::

You may also like

1 comment

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.