शाही रसरशीत बालुशाही अस्सल गोडवा देण्याचा आनंद!! Shahi Balushahi
प्रस्तावना/Introduction:::
बालुशाही म्हटलं म्हणजे सर्वांचे तोंडाला पाणी सुटते परंतु ती बालुशाही कडकही नको आणि शिवाय बालुशाही तोडल्यानंतर त्यामध्ये छान रसरशीतपणा हवा….. म्हणजेच ती बालुशाही अगदी मधून रसदार हवी…. तुम्ही बनवता का हो अशी रसरशीत बालुशाही??????
ती कशी बनवली जाते आणि त्याचे प्रमाण किती आहे आणि हलवाई याप्रमाणेच बालुशाही बनवतात का त्यांची एवढी चवदार का बनते!!!!
सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या या खालील रेसिपी मध्ये मिळणारच आहे!!!!
सण आले की वेगवेगळे पदार्थ आपण बनवतोस शिवाय आवर्जून गोड एखादा पदार्थ यामध्ये असतोच दिवाळी सारख्या सणाला बालुशाही अगदी शाही पदार्थ म्हणून मानला जातो…..
साहित्य/Ingredients:::
३०० ग्रॅम मैदा ४०० ग्रॅम साखर खाण्याचा पिवळा किंवा ऑरेंज रंग पाच ते सहा वेलची आणि 100 ग्रॅम मोहन देण्यासाठी साजूक तूप तळण्यासाठी साजूक तूप अर्धी वाटी दही एक चमचा बेकिंग पावडर आणि पाणी
कृती/ Procedures:::
सर्वप्रथम आपण मैदा चाळून घेऊ मैदा चाळून घेतल्यामुळे मैदा हलका होतो आणि आपली बालुशाही एकदम सॉफ्ट तयार होते…. मैदा चाळल्यानंतर किंवा चाळत असताना त्यामध्ये एक चमचा इतकी बेकिंग पावडर घाला आणि ते बेकिंग पावडर सोबतच चाळून घ्या… आता हे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर त्यामध्ये 100 ग्रॅम इतके साजूक तूप घाला आणि सर्व मैद्याच्या मिश्रणाला सोडून घ्या… म्हणजे आपले बालुशाहीला परफेक्ट असे मोहन बसेल… आता यामध्ये अर्धी वाटी दही किंवा तीन चमचे इतके दही घाला आणि तेही व्यवस्थित चोळून घ्या… हे चोळत असताना आपल्याला हलक्या हाताने चोळायचे आहे….. आता यामध्ये पाण्याचा शिपका मारून आपले मैद्याचे मिश्रण गोळा करा… हे मिश्रण अगदी मळून मळून गोळा तयार करायचा नाही…. अगदी अलगद हाताने फक्त ते मिश्रण एकत्र आणा आणि त्याचा हळुवार असा हलक्या हाताने गोळा तयार करा…. आणि हा गोळा साधारण 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा…. गोळ्या मळत असताना ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मळायचं नाही अगदी हळुवार प्रमाणे जमा करत एका जागी गोळा तयार होईल याप्रमाणे गोळा करा…. कारण आपण गोळा अगदी मळून घेतला तर आपल्या बालुशाहीला लेयर सुटणार नाही आणि ती अगदी छान हलवाई सारखी फुलणार नाही….
साखरेच्या पाकाची कृती/String making:::
एका पातेल्यामध्ये 400 ग्राम साखर घाला त्यामध्ये अर्धी वाटी चे पाणी घाला….. आता साखरेचे मिश्रण सतत ढवळत रहा आणि त्याचा एक तारी पाक करा… एकतारी पाक तयार झाला आहे कसे समजेल तर आपण चमच्याने पाक सोडताना ज्यावेळेस आपले पाकाचे थेंब हळूहळू खाली पडतात म्हणजे शेवटच्या थेंब एकदम हळुवारपणे पडेल म्हणजे आपला पाक तयार झाला असे समजावे किंवा दुसरी पद्धत म्हणजे हाताला पाक घेऊन त्याचा एक तार होतो आहे का हे बघणे…. आता या पाकामध्ये चिमूटभर ऑरेंज रंग घाला आता यामध्ये वेलची पूड घाला आणि आपला पाक चांगला व्यवस्थित एकत्र करून घ्या आपला साखरेचा पाक आता तयार झालेला आहे…..
बालुशाहीची कृती/Balushahi Making:::
आता आपल्या बालुशाहीचे मिश्रण चांगले मुरलेले असेल….. आता या मिश्रणाचे छान लहान लहान गोळे करून घ्या…. गोळे तयार झाल्यानंतर त्यामध्ये लाटण्याच्या साह्याने होल करून घ्या…. होल केले तर आपला साखरेचा पाक छान बालुशाहीच्या आत मध्ये सुद्धा मुरेल… आणि ती सर्व बाजूंनी समान अशी गोडसर होईल…. या पद्धतीने सर्व गोळे तयार करून घ्या आणि थोडी चपटे बनवून त्यामध्ये होल करून घ्या… आता कढईमध्ये तूप गरम करून घ्या… हे तूप एकदम कडकडीत गरम करायचे नाही हे कोमट तूप ठेवायचे आहे…तूप विरघळल्यानंतर त्यामध्ये चार बालुशाही घाला आणि या बालुशाहीला जोपर्यंत बालुशाही फुलून वरती येत नाही तोपर्यंत ही बालुशाही पलटी करायची नाही… साधारण तीन ते चार मिनिटांनी बालुशाही वर येऊन छान तिचे लेयर सुटलेले असतील आणि मग आपल्या सर्व बालुशाही आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे म्हणजे दोघ बाजूने त्याची छान असेल गॅसची आच मंदच ठेवायची आहे…. आपल्याला बालुशाही तयार करत असताना ही काळजी घ्यायची आहे की मंद आचेवरच बालुशाही तयार करायची आहे… त्यानंतर दोघं बाजूने चांगला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या…. आता डोकं बाजूने तांबूस रंग आल्यावर आपली बालुशाही काढून घ्या आणि ती साखरेच्या पाकामध्ये घाला साधारण दोन ते तीन मिनिटे साखरेच्या पाकामध्ये राहू द्या….. आता या बालुशाही चांगला पाक मुरलेला असेल एका ताटामध्ये आपल्याला बालुशाही काढून घ्यायची आहे…. हा बालुशाहीचा पाक कोरडा झाल्यानंतर बालुशाही तोडल्यानंतर मधून एकदम रसरशीत होईल… याच पद्धतीने मी पुढच्याही बालुशाही तळून पाकामध्ये सोडून बालुशाही तयार करणार आहे…. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ओल्या पाकावरच किसलेला बदाम किसलेला काजू किंवा पिस्त्याची पावडर घालू शकतात आपली गरमागरम रसरशीत अशी बालुशाही तयार झालेली आहे… तुम्ही केली का मग अशी रसरशीत बालुशाही???
टिप्स Tips:::
यामध्ये अगदी अचूक प्रमाण दिलेले आहे याप्रमाणे बालुशाही घेतल्यास कुठेही बिघडण्याची भीती नाही …… फक्त बालुशाही तळत असताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे अगदी कोमट तेलामध्ये बालुशाही आपल्याला सुरुवातीला घालायची आहे जेणेकरून त्याची लेयर सुटले पाहिजेत….
वेळ आणि परिमाण Time and Quantity:::
तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ::६० मिनिटे
परिमाण ::१ किलो साधारण
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords




