मँगो रवा केक

by Vaishali Chaudhari
0 views

मँगो रवा केक


प्रस्तावना:::

एक घरी करायचा म्हणजे झटपट कसा होईल हा केक याची आपण वाट बघत असतो असंच आपण आज केक बघणार आहे…

आता सध्या आंबे खूप चांगले येत आहे त्यामुळे आपण इथे आंब्याचा वापर करून मॅंगो केक तयार केलेला आहे… इतर वेळी आंबा नसल्यास तुम्ही आंब्याचा इसेन्स किंवा मँगो इसेन्स आणि मंगो फूड कलर म्हणजेच येल्लो कलर फूड कलर वापरून तुम्ही केक तयार करू शकतात ….

पण मी इथे कुठलाही फूड कलर वापरलेला नाही कारण मी ते आंब्याच्या रसाचा वापर केलेला आहे .. आंब्याच्या रसामुळे एक सुंदर रंग त्याला येतो…


साहित्य :::

  • अर्धी वाटी आंब्याचा काढलेला रस
  • एक वाटी रवा
  • अर्धी वाटी साखर
  • पाव वाटी बटर
  • अर्धी वाटी दूध
  • दोन चमचे बेकिंग पावडर
  • पाव चमचा बेकिंग सोडा
  • एक चमचा व्हॅनिला इसेन्स किंवा मॅंगो इसेन्स


कृती:::

इथे मी एक केसर आंबा घेतलेला आहे त्याच्यावरचा गर काढून मिक्सरमधून त्याची प्युरी करून घेतलेली आहे….

तुमच्याकडे जो पण आंबा असेल त्या आंब्याचा तुम्ही वापर करू शकता केसर आंबा किंवा हापूस आंब्याचा वापर केल्यास चव तर छान लागेलच शिवाय रंग ही खूप सुंदर येईल….

त्यानंतर पिठीसाखर तयार करून घ्या… इथे मी पाव वाटी वापरलेली आहे कारण रसामध्ये ऑलरेडी गोडपणा असतो..


एका पातेल्यामध्ये दही मेल्ट केलेले बटर वितळलेले बटर घालून त्यामध्ये पिठीसाखर घाला आणि मिश्रण व्यवस्थित विस्करच्या साह्याने घोटून घ्या त्यामध्ये आंब्याचा रस घाला…

त्यानंतर त्यामध्ये रवा घाला आणि मिश्रण चांगले फेटून घ्या… त्यामध्ये एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालून फेटून घ्या..

साधारण दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण असेच राहू द्या आपला रवा चांगला फुलून येईल… तोपर्यंत आपण केक ठेवण्यासाठी ची तयारी करून घेऊ कुकरमध्ये पाणी गरम करण्यास ठेव त्यामध्ये एक स्टॅन्ड ठेवा….

.हा केक आपल्याला वापरायचा आहे… आतापर्यंत आपण केक बेक केलेला आहे आता वाफवलेला केक कसा लागतो हे बघणार आहे…

एका कुकरच्या टीमला बटर लावून घ्या त्यावर थोडेसे मैदा भुरभुरवा… किंवा तुमच्याकडे केकटीन असल्यास त्याला तूप लावा किंवा बटर लावा आणि चांगले ग्रीसिंग करून घ्या…

त्यानंतर केकचे मिश्रण आपले चांगले फुलून तयार झालेले असेल… त्यावर दोन चमचे बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा घाला आणि त्यावर थोडे दूध घाला आणि मिश्रण हळुवारपणे फेटून घ्या..

हे मिश्रण हळुवारपणे फेटावे जोरजोरात पेटू नये …. कारण मिश्रण ऍक्टिव्हेट होईल…. यामध्ये तुम्ही एक पुडी इनोचा सुद्धा वापर करू शकता अशा वेळेस बेकिंग पावडर नसेल किंवा बेकिंग सोडा नसेल…

आता आपण तयार केलेले केकचे मिश्रण केक टिन मध्ये घालून त्यावर काजूचे काप घाला किंवा बदामाचे काप घाला…

आणि कुकरमध्ये 25 मिनिटांसाठी वाफवण्यास ठेवा… कुकर वर झाकण ठेवा.. 25 मिनिटे हा केक आपल्याला वाफवून घ्यायचा आहे त्यानंतर हा केक काढून घ्यावा…

केक मध्ये सूरी घालून बघावी केक चिकटत असल्यास पुन्हा पाच मिनिटे बेक करा नाहीतर आपला केक तयार झालेला आहे…

आता केक थंड होऊ द्या त्यानंतर त्यावर एक डिश पालथी घाला आणि मागच्या साईडने ठोकून केक काढून घ्या…. केक हा थंड झाल्यावरच काढावा….

आपला छान असा मॅंगो केक तयार झालेला आहे…आंब्याच्या दिवसांवर हा आंब्याचा केक नक्की करून बघावा लहान मुलांना अत्यंत आवडतो…

इथे आपण मँगो केकचा पल्प चा वापर केल्यामुळे आपल्याला फूड कलरची गरज पडणार नाही एक नॅचरल फूड कलरचं काम आंबा करेल…

त्यामुळे मी ते फूड कलर वापरलेला नाही तुमच्याजवळ आंबा नसल्यास तुम्ही आंब्याचा इसेन्स वापरू शकतात…


टिप्स:::

केक तयार करताना केक कधीही थंड झाल्यानंतर मगच काढावा… लगेचच केक काढू नये केक बेक होताना केकचे झाकण उघडून बघायचे नाही… केक बसण्याची शक्यता असते…


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ:३० मिनिटे
एकूण वेळ ::५०मिनिटे
परिमाण:: अर्धा किलो केक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8347

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.